Yogas To Relieve Menstrual Cramps : मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. दर महिन्याला महिलांना मासिक पाळीला सामोरे जावे लागते. अनेकांना मासिक पाळीत असहनीय वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. काही वेळा महिला घरगुती उपाय करतात पण मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी योगा फायदेशीर ठरू शकतो. या संदर्भात योग अभ्यासात मृणालिनी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी तीन योगासने सांगितले आहेत. या योगासनांच्या मदतीने तुम्हाला आराम मिळू शकतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (how to stop period pain)
मृणालिनी यांनी व्हिडीओमध्ये हे तीन योगासने करून दाखवली आहे आणि त्याचे फायदे सुद्धा सांगितले आहेत.
१. सुप्त बद्धकोनासन(१ ते २ मिनिटे)
- ओटीपोटजवळील स्नायूंची हालचाल होऊन रक्त प्रवाह सुरळीत होतो.
- मासिक पाळीच्या वेदना आणि अस्वस्थता दूर होते.
२. शशांकासन (१ ते २ मिनिटे)
- पेल्विक क्षेत्राभोवती मिळणाऱ्या हलक्या स्ट्रेचमुळे आराम मिळतो
- मन शांत होऊन आराम मिळतो.
३. मार्जरीआसन (५ ते १० वेळा)
- मासिक पाळीच्या वेदना, पाठदुखी आणि अस्वस्थता दूर होते.
- ऊर्जा पातळी सुधारून थकवा दूर होण्यास मदत होते.
हेही वाचा : रक्तातील साखर कमी करून मधुमेहावर नियंत्रण ठेवायचयं? फक्त ‘या’ दोन गोष्टी करा; महिनाभरात दिसेल फरक
पाहा व्हायरल व्हिडीओ
yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मासिक पाळीत योगासने करावीत का? यावर बरेच विवादस्पर मते तुम्हाला मिळतील परंतु व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आसनांसह काही सौम्य योग, काही संतुलित प्राणायाम, ध्यान किंवा योग निद्रा हे तुमच्या मासिक पाळीच्या काळात फायदेशीरच ठरतात.
मासिक पाळीच्या दरम्यान योगा केल्याने पाठदुखी, कंबरदुःखी आणि पेटके दूर होण्यास मदत होते. हलकं हलकं स्ट्रेचिंग केल्याने रक्तप्रवाह उत्तेजित होतो. अस्वस्थता दूर होऊन आराम मिळाल्याने मूड सुधारण्यास मदत होते. मासिक पाळीच्या काळात योगा / व्यायाम हळूवारपणे केले पाहिजे. वेगवान हालचाली किंवा बराच वेळ आसन होल्ड करून ठेवणे टाळा. ओटीपोटावर जास्त दबाव आणणारी आसने, गरम श्वासोच्छवासाच्या पद्धती, शरीरशुद्धी क्रिया टाळा.”
अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला. काही युजर्सनी योगासनांविषयी माहिती दिल्याबद्दल मृणालिनी यांचे आभार व्यक्त केले आहेत.