How To Stop White Discharge In Vaginal Area: योनीतून होणारा स्त्राव योनिमार्गाच्या संसर्गापासून रक्षण करतो. हा स्त्राव म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज हा नैसर्गिक असूनही काहीवेळा त्याचे प्रमाण वाढणे हे वावरताना अडचणीचे ठरू शकते. व्हाईट डिस्चार्जला शास्त्रीय भाषेत ल्युकोरिया (Leucorrhoea) असे म्हणतात. पिरीएड्स दरम्यान व्हाईट डिस्चार्ज होणे सामान्य आहे पण जर एरवी सुद्धा तुम्हाला अधिक प्रमाणात हा त्रास सहन करावा लागत असेल तर मात्र हे धोक्याचे लक्षण ठरू शकते.
सततच्या अधिक व्हाईट डिस्चार्जमुळे पाठदुखी, मूड स्विंग्ज, कॅल्शियमची कमतरता अशा तक्रारी जाणवतात. सहसा शरीर संबंधांच्या वेळी किंवा ताणतणावात, गरोदर असताना अशाप्रकारे अंगावरून पांढऱ्या रंगाचे पाणी जाते. व्हाईट डिस्चार्ज होत असेल किंवा त्याचा रंग वेगळा असेल, वास येत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. आज आपण प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी व्हाईट डिस्चार्जचा त्रास दूर करण्यासाठी सांगितलेले उपाय पाहणार आहोत .
व्हाईट डिस्चार्जवर आयुर्वेदिक उपाय काय?
१) अर्धा चमचा आवळा पावडर आणि अर्धा चमचा मध एकत्र करावा आणि हे मिश्रण सकाळी नाश्त्याच्या वेळेला खावे. त्यानंतर पिकलेले केळं खावं.
२) दुसरा उपाय आहे तांदळाचे पाणी. आपण भात शिजवताना त्यात एक ग्लास अधिक पाणी टाकून भात शिजत असताना बाजूला काढून ठेवू शकता मग हे पाणी तुम्हाला झेपेल त्या तापमानात आले की त्याचे सेवन करा.
हे ही वाचा<< ‘या’ कारणाने पायाच्या नसा सतत फुगीर वाटू शकतात; ‘या’ ३ पद्धतींनी घालवा पोटऱ्यांची सूज
लक्षात घ्या हे उपाय आयुर्वेदिक आहेत त्याचा प्रभाव दिसण्यासाठी सातत्य आवश्यक आहे. यामुळेच आपण निदान महिनाभर तारो हा उपाय करून पाहावा. त्यानंतरही समस्या दूर होत नसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.