Jugaad Video: सोशल मीडियावर कायमच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल प्लॅटफॉर्म व्हायरल व्हिडिओचा खजिना आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही. कधी लोकांचे अनोखे जुगाड पाहायला मिळतात. तर कधी लोकांना आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. व्हायरल होत असलेल्या या महिलेच्या व्हायरल व्हिडिओने आता अनोखा जुगाड दाखवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. गृहिणींकडे काही ना काही घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. तिने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

महिलेने केळी आणि पेनाचा भन्नाट असा जुगाड शेअर केला आहे. पेन आणि केळी याचा काय जुगाड असेल, हे वाचून तुम्हीही विचारात पडले असाल ना. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक हटके ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकच्या मदतीने केळी खराब होणार नाहीत, केळी जास्त काळ ताजी ठेवण्याची युक्ती महिलेने सांगितली आहे. केळी हे असे फळ आहे जे दीर्घकाळ टिकू शकत नाही. फळे चांगली राहण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवतो. मात्र, केळी फ्रीजमध्ये ठेवता येत नाहीत. अशात ती बाहेर ठेवल्यास काळी पडून खराब होतात. केळी लवकर खराब होऊ नये, यासाठी हा प्रयोग नक्की करुन पाहा, असे महिलेचे म्हणणे आहे.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mp theft viral video
VIDEO : दुकानात चोरी करण्याआधी चोराने घेतले देवाचे आशीर्वाद, नंतर लॉकरमधील पैसे चोरून झाले पसार; घटना CCTV मध्ये कैद
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

(हे ही वाचा: Jugaad Video: नव्या झाडूला दरवाजाचे कुलूप लावून पाहा; दोन मिनिटांत ‘या’ मोठ्या समस्येतून होईल सुटका!)

तुम्हाला नेमकं काय करायचं? 

महिलेने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, केळ्यांचा एक घड घ्यायचा आहे. त्यानंतर एक पेन घेऊन त्याला एक दोरी बांधायची आहे. दोरी पेनाच्या मधोमध बांधायची आहे. मग ही दोरी केळ्यांच्या घडाच्या मध्यभागातून दुसऱ्या बाजुने बाहेर काढायची आहे. दोरीला असलेला पेन केळाच्या घडाला अडकेल आणि दोरी व्यवस्थितपणे अडकली जाईल. त्यामुळे तुम्ही केळीचा घड कुठेही लटकवून ठेवू शकता. यामुळे तुमच्या केळी खराब होणार नाही, केळी कुठेही खाली ठेवल्याने त्यावर दाब पडल्याने वरच्या केळींमुळे खाली असलेल्या केळी खराब होऊ शकतात. त्यामुळे केळी खाली ठेवण्याऐवजी पेन आणि दोरीच्या साहाय्याने लटकवून ठेवल्याने, दाब त्यावर पडणार नाही. त्यामुळे तुमच्या केळी खराब होणार नाही, असे महिलेचे म्हणणे आहे.

येथे पाहा व्हिडीओ

Priti Rasoi या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)

 

Story img Loader