Curry Leaves : कढीपत्ता हा आपण सहसा स्वयंपाक करताना अनेक पदार्थांमध्ये टाकतो. कढीपत्ता फक्त अन्नाची चवच वाढवत नाही, तर त्याशिवायही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेकांच्या घरी कढीपत्त्याचं झाड असतं; तर काही लोक गरजेनुसार तो विकत घेतात. काही लोकांचा असा गैरसमज आहे की, कढीपत्ता जास्त दिवस टिकत नाही; पण कढीपत्ता तुम्ही अनेक महिने साठवून ठेवू शकता. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊ या ….
- जर तुम्हाला कढीपत्ता साठवून ठेवायचा असेल, तर भरपूर कढीपत्ता जमा करा. त्यानंतर हा संपूर्ण कढीपत्ता स्वच्छ पाण्यानं धुऊन, त्यातील खराब व चांगली पानं वेगवेगळी करा.
- बाजूला केलेली कढीपत्त्याची चांगली पानं एक-दोन दिवस उन्हात ठेवा किंवा ती पानं पेपरमध्ये गुंडाळून पंख्यासमोर ठेवा.
हेही वाचा : Sleep Time : रात्री कधी आणि किती तास झोपावे? जाणून घ्या वयानुसार झोपण्याचे वेळापत्रक
- कढीपत्त्याची ही पानं व्यवस्थित वाळल्यानंतर हवाबंद डबा किंवा बॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. असं केल्यामुळे कढीपत्त्याला बुरशीपासून धोका नसतो. याबरोबर कढीपत्ता खूप ताजा असतो. तुम्ही हा कढीपत्ता ५-६ महिने वापरू शकता. जर तुमच्याकडे फ्रिज नसेल, तर तुम्ही थंड ठिकाणी हा कढीपत्ता ठेवू शकता.
- जर तुम्हाला ५-६ महिने कढीपत्ता साठवून ठेवायचा नसेल; पण १०-१२ दिवस ताजा असावा, असे वाटत असेल, तर तुम्ही कढीपत्ता पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून तो फ्रिजमध्ये ठेवू शकता; पण तीनचार दिवसांनंतर पेपर टॉवेल बदलणं आवश्यक आहे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)