Food Storage: पावसाळ्याचा ऋतू सुरू झाला आहे. या काळात लोक एकदाच बाजारात जास्त दिवसांसाठी जाऊन फळे- भाज्या घेऊन येतात. पावसामुळे वारंवार बाहेर पडायला नको म्हणून बहूतेक लोक हा पर्याय निवडतात. पण जास्तीच्या भाज्या-फळे आणल्यानंतर त्या योग्य पद्धतीने साठवल्या नाहीत तर त्या दोन-तीन दिवसातच खराब होऊन जातात. कधी एक दोन दिवसात केळी काळी पडतात तर कधी कोथिंबीर काळी पडते. अशा वेळी हे पदार्थ व्यवस्थित साठवून ठेवणे आवश्यक आहे. चला जाणून घ्या फळे-भाज्या कशाप्रकारे साठवावे जेणेकरून दिर्घकाळापर्यंत फ्रेश राहू शकतात.
फळे आणि भाज्या साठवण्याच्या सोप्या टीप्स
टोमॅटो कसे करावे साठवावे
टोमॅटो सध्याच्या काळात खूप महाग झाले आहेत. त्यामुळे खराब टोमॅटो अजिबात खरेदी करू नका. तुम्हाला टोमॅटोचा हिरवा भाग जिथे तो देठापासून तोडला जातो तिथे चिकटपट्टी लावून ते फ्रिजमध्ये ठेवा. टोमॅटो जास्त काळ ताजे राहतील असे तुम्हाला दिसेल.
हेही वाचा –पावसाळ्यात साखर आणि मीठात ओलावा येऊ नये म्हणून वापरा ‘या’ सोप्या टीप्स
केळी लवकर काळी पडणार नाही
केळी पिकली की लगेच काळी पडतात आणि त्यांना खाणे अशक्य होऊन जाते. अशा परिस्थितीमध्ये केळी सर्वात आधी धुवून घ्या. टिशू पेपर किंवा टॉवेल घेऊन थोडासा ओला करा आणि तो केळाच्या मुळांना गुंडाळून ठेवा. जोपर्यंत तुम्ही केळ खाण्यासाठी वापरणार नाही तोपर्यंत तसेच राहू द्या.
कोथिंबीर काळी पडणार नाही
कोथिंबीर दोन-तीन दिवसात काळी पडते. पेपर टॉवेलच्या मदतीने तुम्ही कोथिंबीर ताजी टेवू शकता. कोथिंबीरीची मुळ टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा तो पेपर थोडा ओला करा आणि एक काचेचा ग्लास घेऊन कोथिंबीरचा टिश्यूसोबत ग्लासमध्ये उभा केला जाऊ शकतो.
पत्ता कोबी राहील ताजा
साधारण अर्धा महिना पत्ताकोबी ताजा राहू शकतो त्यासाठी त्याचे मुळ कापू टाका. आता त्यावर टिश्यू पेपर टाका आणि पाणी शिंपडा. पत्ता कोबी जशाच्या तसा फ्रिजमध्ये ठेवा. पत्ताकोबी ताजा राहील.
हेही वाचा – महिनाभर मीठ सोडल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…
कांद्याची पात राहील ताजी
कांद्याची पात साठवण्यासाठी एक चांगली पद्धत आहे टिश्यू पेपरचा वापर. टिश्यू पेपर पसरवा आणि कांद्याच्या पातीची मुळं त्यावर ठेवा आणि थोडे पाणी शिंपडा आणि टिश्यूला कांद्याच्या पातीच्या मुळांना गुंडाळून ठेवून फ्रिजमध्ये ठेवा.