चपाती हा आपल्या रोजच्या जेवणात हमखास असणारा पदार्थ. तुम्हाला मऊ आणि गोल चपाती तयार करता येत असेल तर तुम्ही सुगरण आहात असे समजू शकता. बऱ्याचदा सकाळी केलेली चपाती रात्रीपर्यंत वातड होऊ शकते म्हणूनच चपाती मऊ व्हावी यासाठी आपण वेगवेगळ्या टि्प्स वापरतो. दिवसभर चपाती ताजी कशी ठेवावी हे तुम्हाला माहित असेल पण तुम्हाला चपाती महिनाभर ताजी ठेवता येऊ शकते? हे तुम्हाला माहितीय का? होय. कदाचित अनेकांना हे माहित नसेल पण हे खरंच शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला महिनाभर चपाती ताजी कशी ठेवावी यासाठी सोपा उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका महिन्यासाठी चपाती ताजी कशी ठेवायची?

इंस्टाग्रामवर Moms Gup Shup या अकाऊंटवर एका महिन्यासाठी चपाती ताजी कशी ठेवायची? याचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओनुसार, तुम्हाला फक्त नेहमीप्रमाणे पीठ मळून चपाती लाटून घ्यायची आहे. पण ही चपाती भाजताना मात्र पूर्ण भाजायची नाहीत. चपाती तव्यावर टाकल्यानंतर एका बाजून थोडावेळ भाजू द्या. त्यांनतर ती फक्त एकदा पलटा आणि थोडावेळी भाजू द्या. तुम्हाला ही चपाती तुम्हाला अर्धीच भाजून घ्यायची आहे. त्यानंतर ती तव्यावरून काढा. त्यानंत बटर पेपरमध्ये एकावर एक या चपात्या ठेवा आणि त्या एका हवाबंद प्लॉस्टिकट्या पिशवीत ठेवा. आता ही पिशवी तुम्ही फ्रिजरमध्ये ठेवा. तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा यातील चपाती काढा आणि तव्यावर भाजून घ्या. चपाती नेहमीप्रमाणे टम्म फुगेल. तुम्ही गरम गरम चपाती खाऊ शकता.

हेही वाचा – पावसाळ्यात ओली छत्री घेऊन फिरणे त्रासदायक ठरतेय? ‘या’ ट्रिक वापरा अन् पटकन सुकवा छत्री

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये महिलांना रोज मुलांचा डब्बा, दिवसभराचे जेवण करुन ऑफिसला जावे लागते. अशा वेळी कितीही नियोजन केले तरी उशीर होतो. अशा वेळी तुम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी आठवडा किंवा महिनाभर पुरतील अशा चपात्या आधीच तयार करून साठवून ठेवू शकता.

तसेच आपल्याकडे बहूतेक पुरुषांना स्वयंपाक तयार करता येत नाही त्यामुळे ते जेवणासाठी महिलांवर अवलंबून असतात. अशा परिस्थिती जर महिलांना काही दिवसांसाठी माहेरी किंवा कामानिमित्त बाहेर जायचे असल्यास अशा पुरुषांच्या जेवणाची गैरसोय होते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही महिनाभर पुरतील इतक्या चपात्या तयार करून साठवून ठेवू शकता.

हेही वाचा – पावसाळ्यात किडे-मुंग्यापासून सुटका मिळवण्यासाठी स्वयंपाकघरात ठेवा ‘या’ ६ गोष्टी!

सध्या धावपळीच्या आयुष्य पाहता हा पर्याय तुम्हाला सोयीस्कर वाटत असला तर त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. निरोगी आरोग्यासाठी ताजे आणि गरम जेवण खाणे योग्य आहे. त्यामुळे अत्यंत गरजेच्या वेळी तुम्ही हा उपाय वापरावा अशी शिफारस केली जाते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to store fresh roti for a month know simple trick snk
Show comments