रोज स्वयंपाक करतानाआपल्या कडीपत्ता, कोथिंबीर, पुदीना हा हमखास लागतो. बाजारातून आणल्यानंतर काही वेळात पुदिना काळा पडतो किंवा खराब होतो. त्यामुळे पुदिना फेकून द्यावा लागतो आणि जेव्हा गरज असते त्यावेळी तो उपलब्ध नसतो. काळजी करू नका या लेखात तुम्हाला वर्षभर पुदिना साठवण्याचा सोप्या पद्धती सांगितल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुदीना खरेदी करतानाचे ही घ्या काळजी
- खरेदी करताना ताजा, गडद हिरव्या रंगाचा पुदिना घ्या. पिवळा रंगाचा पुदिना घेणे टाळा
- बाजारातून आणलेला पुदिना ओला असू शकतो म्हणून तो काही वेळ पेपरवर मोकळा करू ठेवावा. त्यातून ओलावा निघून जातो.
- पुदिन्याचे देठ ओले असतात त्यामुळे त्याची पाने खराब होऊ शकतात. पाने नीट सुकवून घ्या.
हेही वाचा – शाहरुख खानला झाला उष्माघाताचा त्रास; वयाच्या पन्नाशीनंतर निर्जलीकरण कसे टाळावे?
पुदिना कसा साठवावा?
१) टिश्यू पेपर
पुदिन्याची पाने ठवण्यासाठी एका डबा घ्या. त्यात एक टिश्यु पेपर ठेवा. त्यावर पुदिना ठेवा. आता पुदिन्यावर पुन्हा एक टिश्यू पेपर ठेवा आणि झाकण लावून फ्रिजमध्ये ठेवू शकता. दोन तीन दिवसांनी डब्बा चेक करा. टिश्यू पेपर बदला. काळा झालेला पुदिना काढून टाका जेणे करून सर्व पुदिना खराब होणार नाही.
२) पुदिन्याचे देठ
पुदिन्याचे देठ फेकून देऊ नका. पुदिन्याचे देठ काही काळ पाण्यात ठेवा. त्याला पालवी फुटू लागली की ते कुंडीत लावा. त्यामुळे तुम्हाला घरच्या घरी ताजा पुदिना मिळू शकतो.
३) पुदीना पावडर
पुदिना एका भांड्यात पाणी घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्याती माती निघून जाईल. त्यानंतर एका कापडावर पुदिना टाकून चांगला सुकवून घ्या. त्यानंतर सुकलेली पुदिन्याचे पाने मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या.
४) आईस क्युब
पुदीना धुतल्यानंतर मिक्स मध्ये वाटून घ्या. त्यानंतर त्यात थोडे पाणी घालून पेस्ट करा. हवे असेल तर यात कोथिंबीर टाकू शकता. या पेस्टपासून पुदिना आईस क्युब करायचे आहेत जे आपण चटणीसाठी किंवा पाणीपुरीचे पाणी तयार करण्यासाठी वापरू शकता. या पेस्टमध्ये पाणी घालून आईस ट्रेमध्ये ओता आणि फ्रिजमध्ये बर्फ करण्यासाठी ठेवा. गरज पडेल तसे हे पुदिन्याचे आईस क्युब वापरा.
पुदिन्याची पाने चिरून ती आईस ट्रेमध्ये टाका आणि त्यात पाणी ओतून त्याचे आईस क्युब करून घ्या.
५) मायक्रोओव्हमध्ये बनवा पुदिना पावडर
मायक्रोओव्हमध्ये पुदिना काही वेळ पोस्ट करण्यासाठी ठेवा. पुदिना चांगला कुरुकुरीत होत नाही तोपर्यंत त्याला रोस्ट करा. थंड झाल्यावर हवा बंद डब्यामध्ये साठवू ठेवा किवा रोस्ट केलेली पाने हाताने चुरा करून पावडर करा आणि चाळून घ्या. नंतर एका डब्यात साठवून ठेवा.