Kitchen Tips : लसूण सोलणे हे खूप वेळखाऊ काम आहे. अशावेळी अनेक महिला एकाचवेळी भरपूर लसून सोलून ठेवतात. तर काही महिला बाजारातून सोललेला लसूणचं विकत घेतात. पण एकाचवेळी भरपूर सोललेला लसूण लवकर खराब होण्याची चिंता असते. कारण हा लसूण सडून किंवा सुकून खराब होतो. अशा परिस्थिती सोललेला लसूण साठवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या फॉलो करुन तुम्ही सोललेला लसूण अनेक महिने ताजा ठेवू शकता.
सोललेला लसूण साठवण्यासाठी वापरा ‘या’ ट्रिक्स
१) सर्वप्रथम बाजारातून चांगल्या प्रतीचा लसूण खरेदी करा. हे लसूण ताजे असतात शिवाय लवकर खराब होत नाहीत.
२) यानंतर सर्व लसूण सोलून ठेवा, आता हे लसूण दिवसभर उन्हात वाळवा. जेणेकरुन वरचा ओलावा निघून जाईल.
३) यानंतर लसूण टिश्यू पेपरवर ठेवा आणि पुसून घ्या. जेणेकरुन लसणातील ओलावा काढता येईल.
४) आता एका काचेच्या बरणीच्या तळाशी टिश्यू पेपर पसरवा. नंतर त्यात सोललेली आणि चांगली वाळलेली लसूण भरा.
५) एअर टाईट झाकण लावून बरणी बंद करा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
अशाप्रकारे सोललेला लसूण ठेवल्यास तो लवकर खराब होणार नाही आणि अनेक महिने ताजी राहील. जेव्हा तुम्हाला भाजी किंवा कोणत्याही डिशमध्ये लसूण टाकायची असेल तेव्हा तो फ्रीजमधून बाहेर काढून वापरा.
कापलेला लसूण असा करा स्टोर
जर चुकून तुमच्याकडून जास्त लसूण कापला गेला असेल किंवा ठेचला असाल तर लसूण साठवण्यासाठी एअर टाइट टिफिन बॉक्स वापरा. यानंतर तो बॉक्स फ्रीजमध्ये ठेवा.