How To Store Rice : धान्य साठवणूकीचे मुळात दोन प्रकार आहे एक म्हणजे लहान प्रमाणावरील साठवण आणि दुसरी म्हणजे मोठ्या प्रमाणावरील साठवण. साठवणूक कोणत्याही प्रकाराची असली तर धान्याला किड लागू नये, याची सर्वांना काळजी असते. त्यामुळे वर्षभरासाठी लागणाऱ्या धान्याला किड लागू नये, जाळी लागू नये यासाठी आपण वाट्टेल ते उपाय करतो. आज आपण तांदूळ कसा साठवावा आणि त्याला जाळी किंवा किड लागू नये म्हणून काय करावे, याविषयी जाणून घेणार आहोत.
सहसा तांदळाला अधिक काळ साठवायचा असेल तर तांदळाला बोरीक पावडर लावून ठेवतात किंवा त्यात कडू लिंबाचा पाला टाकतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक अनोखा उपाय सांगितला आहे. आज आपण त्या विषयी जाणून घेणार आहोत. व्हिडीओतील महिलेनी दावा केला आहे की या उपायामुळे तांदळाला किड, जाळी लागणार नाही.
हेही वाचा : रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
या व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –
सुरुवातीला तांदूळ स्वच्छ निवडून घ्या त्यानंतर चाळणीच्या मदतीने गाळून घ्या.
त्यानंतर लाल मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घ्या.
त्यानंतर तु्म्हाला ज्या लहान मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ साठवायचा आहे त्या भांड्यामध्ये सुरुवातीला लाल मिरच्या टाका त्यानंतर तांदूळ टाका.
तांदळामध्ये लसणाच्या पाकळ्या टाका आणि तांदळाच्या आतमध्ये थोड्या मिरच्या टाका.
लसणाच्या पाकळ्या वाळल्या तर त्या पाकळ्या काढून घ्या आणि नवीन लसणाच्या पाकळ्या टाका.
या ट्रिकमुळे तुमच्या तांदळाला किड किंवा जाळी लागणार नाही आणि तांदळामध्ये अळ्या सुद्धा होणार नाही.
पाहा व्हिडीओ
prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तांदळाला वर्षानुवर्षे असे साठवा किड, अळी, जाळी लागणारच नाही” या व्हिडीओवर काहूी युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या पेक्षा बोरीक पावडर लावून ठेवायचे” तर एका युजरने लिहिलेय, “आग ताई आमचे दहा क्विंटल आहे तांदूळ”