हिवाळ्यातील गुलाबी थंडीत येणाऱ्या, लाल चुटकदार रंगाच्या आंबट-गोड अशा स्ट्रॉबेरीज बाजारात दिसायला लागल्याबरोबर आपण त्यांना घरी घेऊन येतो. बरोबर लहान मुलं असतील तर अगदी हट्टाने या फळांचा अजून एक बॉक्स आपल्याला घ्यायला लावतात. मात्र, बरेचदा काही स्ट्रॉबेरीज खाऊन आपण उरलेल्यांना फ्रीजमध्ये ठेऊन देतो आणि त्यांच्याबद्दल आपल्याला आठवणही राहत नाही. नंतर एक-दोन दिवसांनी आपल्याला फ्रीजमध्ये खराब झालेल्या स्ट्रॉबेरीज दिसल्यावर खूप वाईट वाटतं. असं तुमच्याबरोबरही झालं आहे का?

पण काय करणार, ही आंबट-गोड फळं होतातच भराभर खराब, नाही का? परंतु, त्यांना वर्षभर आपल्या फ्रीजमध्ये साठवून ठेवता आले तर किती बरं होईल. तर हीच किचन ट्रिक इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @nehadeepakshah या हँडलरने आपल्या अकाउंटवरून शेअर केली आहे. यामध्ये अगदी सोप्या व इतर कोणत्याही गोष्टींचा वापर न करता आणि स्ट्रॉबेरी वर्षभर खराब न होऊ देता कशा टिकवून ठेवायच्या, याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत त्या पाहा.

Hack to remove coconut from its shell
नारळाच्या करवंटीमधून खोबरे बाहेर काढण्यासाठी ‘ही’ सोपी पद्धत नक्की ट्राय करा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Rose Winter Care: 7 Tips To Take Care of Your Rose Plants In Cold Weather
हिवाळ्यातसुद्धा गुलाबाच्या झाडावर उमलतील टवटवीत फुले; रिझल्ट बघून आनंदून जाल, बहरून जाईल घर, जाणून घ्या टीप्स
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी

हेही वाचा : किचन टिप्स : घरातील ‘या’ अन्नपदार्थांचे आयुष्य वाढवा; पाहा ‘हे’ पाच सोपे, उपयुक्त आणि घरगुती उपाय…

स्ट्रॉबेरी वर्षभर फ्रीजमध्ये साठवून ठेवण्याच्या दोन ट्रिक्स :

पहिली पद्धत –
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये किंवा पातेल्यात पाणी घाला.
यामध्ये बाजारातून आणलेल्या स्ट्रॉबेरीज घालून, त्यांना हलक्या हाताने धुवून घ्या. या फळांवरील सर्व माती व्यवस्थित काढून टाका.
आता एका टॉवेलवर धुतलेल्या स्ट्रॉबेरीज पसरून त्यांना हलक्या हाताने पुसून कोरडे करा.
स्ट्रॉबेरीजच्या देठाकडील भाग सुरीने कापून बाजूला करा आणि देठ काढलेल्या स्ट्रॉबेरीज एका ट्रेमध्ये घालून फ्रीजरमध्ये दोन तासांसाठी ठेवून द्या.
आता सर्व स्ट्रॉबेरीज अर्धवट फ्रीज/गोठलेल्या असतील. त्यांना फ्रीजरमधून बाहेर काढा आणि एका झिपलॉक पिशवीमध्ये किंवा हवाबंद झाकणाच्या डब्यात भरून घ्या आणि पुन्हा फ्रीजरमध्ये तुम्हाला हवा तितका वेळ साठवून ठेऊ शकता.

दुसरी पद्धत-
स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुवून घ्या.
त्याची पानं आणि देठाकडील भाग कापून बाजूला करा.
आता सर्व स्ट्रॉबेरीज एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची प्युरी/मिश्रण बनवा.
तयार प्युरी बर्फ बनवण्याच्या ट्रेमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेऊन द्या.
सर्व प्युरीचे बर्फात रूपांतर झाल्यानंतर त्यांना एका झिपलॉक पिशवीमध्ये भरून वर्षभर फ्रीजरमध्ये साठवून ठेवा.

हेही वाचा : Kitchen tips : भात गिचगिचीत किंवा खूप मोकळा होतोय? ‘ही’ असू शकतात त्याची कारणं; या पाच उपयुक्त टिप्स पाहा…

वापर

फ्रीजरमध्ये साठवून ठेवलेल्या या स्ट्रॉबेरीजचा वापर तुम्ही केक, स्मूथी, आईस्क्रीम यांसारखे पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता किंवा नुसते खाऊ शकता. मात्र, असे करण्यासाठी खाण्याआधी त्यांना काही काळ फ्रीजरमधून काढून तापमान साधे होण्यासाठी ठेऊन द्या.

टीप : वर्षभर स्ट्रॉबेरीज साठवून ठेवत असताना त्यांच्यावर कोणताही डाग नसेल किंवा त्या खराब नसतील याकडे लक्ष द्या.

@nehadeepakshah या हँडलरने शेअर केलेल्या या भन्नाट व्हिडीओला आत्तापर्यंत ३.२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader