How to store wheat : गहू हा अन्नधान्यातील महत्त्वाचा घटक आहे. गव्हाच्या पीठापासून बनवल्या जाणाऱ्या पोळ्या या आपल्या दररोजच्या आहारातला भाग आहे. अनेक लोग गव्हाचे पीठ विकत आणतात पण कधी कधी गव्हाचे पीठ हे भेसळयुक्त असते त्यामुळे काही लोक घरी गहू आणतात आणि साठवून ठेवतात पण घरी गहू साठवताना त्याला किड लागण्याची भीती असते पण काही घरगुती उपाय करुन तुम्ही घरी गहू जास्त काळासाठी साठवू शकता. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

१. गहू साठवण्यापूर्वी गहू स्वच्छ करावा. दोन चार वेळा पाण्याने धुवावा आणि उन्हात वाळू द्यावा. त्यानंतर एका स्वच्छ डब्ब्यात साठवून ठेवावा.

२. किड लागू नये म्हणून कडुलिंबाची पाने गव्हाच्या डब्ब्यामध्ये टाकावी. यामुळे गहू जास्त काळ टिकतो.

हेही वाचा : सासू-सुनेने ‘या’ गोष्टी समजून घेतल्यास कधीच होणार नाही भांडण!

३. किड लागू नये म्हणून लसूणच्या पाकळ्याही चांगला पर्याय आहे. लसूणच्या वासामुळे किटक पळून जातील आणि गव्हाला कोणत्याही प्रकारची किड लागणार नाही.

४.आगपेटीची काडी हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. गव्हाला किड लागू नये म्हणून तुम्ही आगपेटीची काडी गव्हामध्ये ठेवू शकता. आगपेटीच्या काडीत सल्फर असते ज्यामुळे किटक पळून जातात

Story img Loader