कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी अगदी चमचाभर बटरसुद्धा पुरेसे होते. पाव भाजी, पराठा, सॅण्डविच आणि असे कितीतरी पदार्थ आहेत की, ज्याचा विचार आपण बटरशिवाय करूच शकत नाही. परंतु, घरात आणलेले बटर वापरल्यानंतर आपण ते फ्रिजमध्ये ठेवून देतो; मात्र त्याला अनेकदा फ्रिजचा वास लागतो आणि त्याची चव बदलते. मग ते कशातही घातले की, त्यालासुद्धा एक वेगळा वास येतो.
त्यामुळे बटर व्यवस्थित कसे ठेवायचे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर शेफ कुणाल कपूरकडे त्याचे उत्तर आहे. शेफने आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या मदतीने बटर साठवून ठेवण्याची योग्य पद्धत दाखविली आहे.
काही जण बटरची छोटी पाकिटे विकत घेतात किंवा गरजेनुसार मोठ्या प्रमाणात हा पदार्थ खरेदी केला जातो. त्यापैकी या शेफने व्हिडीओमध्ये मोठ्या आकाराचे बटर घेतले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला बटरवर असणारा पेपर उघडून, बटरला पेपरच्या टोकाशी नेले आणि त्याचा आकारानुसार सुरीने पेपर कापून घेतला.
हेही वाचा : स्वयंपाकघरात एकही झुरळ दिसणार नाही; घरातील उदबत्त्या अन् कापूर करतील तुमची मदत! पाहा ही सोपी हॅक….
आता त्याच आकाराचे उरलेल्या पेपरचे आणखी तीन भाग केले. नंतर कापलेल्या पेपरचा भाग सुरीवर घेऊन, त्या आकाराचे बटरचे लहान लहान तुकडे करून घेतले आणि ते कापलेल्या बटर पेपरमध्ये गुंडाळून घेतले.
ही क्रिया उर्वरित पदार्थांसोबत केली. असे करून तुमच्याकडे बटरचे चार लहान तुकडे तयार होतील. आता हे तुकडे तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये भरून, ते फ्रिजमध्ये ठेवावेत.
शेफने सांगितलेल्या या किचन ट्रिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी पहिला असून, त्यावर भरपूर कमेंट्स आल्या आहेत. त्यापैकी काही प्रतिक्रिया पाहा.
“खूप मस्त. मीसुद्धा असेच काहीसे करीत होते; परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने. आता ही ट्रिक मी वापरून पाहणार आहे,” असे एकाने लिहिले आहे. तर दुसऱ्याने, “एवढं करण्याऐवजी सरळ बटरची लहान पाकिटं घेणं जास्त सोईचं ठरेल नाही का?” असे लिहिले आहे.
@chefkunal या अकाउंटवरून शेअर झालेल्या या किचन ट्रिक व्हिडीओला आजपर्यंत आठ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.