वातावरण बदलताच पाच वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचं प्रमाण वाढत असतं. पाच वर्षांहून लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने थोड्या थंड हवेनेदेखील त्यांना त्रास होऊन ते आजारी पडतात. पण सतत ताप येणं, आजारी पडणं हा मात्र चिंतेचा विषय आहे. तुमच्या मुलांना सतत ताप येत असले तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडे जा. कारण ताप येण्याची बरीच कारणं असू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कारणामुळे मुलांना सतत ताप येऊ शकतो.

वरचेवर ताप येणं ही व्हायरल किंवा जिवाणू संसर्गाची लक्षणं असू शकतात. ही वारंवार येणाऱ्या तापाचीदेखील लक्षणं असू शकतात. अशा प्रकारचा ताप हा आनुवंशिक दोषामुळे येऊ शकतो. याशिवाय एखाद्या व्हायरससाठी केलेल्या लसीकरणानंतर किंवा जिवाणूंच्या संसर्गानेदेखील ताप येऊ शकतो.

तापाची लक्षणं कशी ओळखावीत?

लहान मुलांच्या शरीराचं तामपान वाढणे, थंडी वाजणे, मुलांची चिडचिड होणे ही तापाची लक्षणं असू शकतात. त्याचबरोबर भूक न लागणे किंवा कमी खाणे, थकवा व अशक्तपणा, लहान-लहान गोष्टींवर रडारड करणे ही देखील तापाची लक्षणे आहेत.

हेही वाचा : पनीरमुळे वजन वाढण्याऐवजी होईल कमी! लक्षात ठेवा या पाच टिप्स….

यावर उपाय काय करावा?

१. जर मुलांना सतत ताप येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशावेळेस डॉक्टरांचा सल्ला फार महत्वाचा असतो.

२. ताप आल्यास मुलांना जास्त प्रमाणात पाणी प्यायला द्या.

३. मुलं कशाप्रकारे श्वास घेत आहेत यावर लक्ष द्या.

४. मुलांना वरचेवर ताप येत असल्यास डॉक्टरांना दाखवा.

५. ताप आल्यावर सतत त्यांच्या शरीराचं तापमान तपासा.

लहान मुलांमध्ये वरचेवर ताप येणं ही जरी सामान्य गोष्ट असली, तरीही त्यावर इलाज करताना आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to take care of a child in fever tips dha