Winter Baby Care : हिवाळ्यात थंडी जस-जशी वाढत जाते तस-तशी ती झेलणे अवघड होऊन जाते. यात लहान मुलांसाठीही थंडी खूप त्रासदायक असते. विशेषत: ज्या लहान बाळांना पहिल्यापासूनचं सर्दी, खोकल्याचा त्रास आहे ते ही थंडी सहन करु शकत नाही. या हंगामात सर्दी, खोकला आणि विविध विषाणूंचा लोकांना खूप त्रास होत असतो. त्यामुळे आपल्याबरोबरच लहान बाळांचीही खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कारण नवजात बालकांची रोग प्रतिकारशक्ती खूप कमकुवत असते. अशावेळी हिवाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊ…
घरातील वातावरण उबदार ठेवा
बाळाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घरातील वातावरण उबदार ठेवा. जर खूपच जास्त थंडी असेल तर तुम्ही घरात हीटर वापरु शकता. पण हीटर वापरताना तो जास्त वेळ चालू राहणार नाही याची काळजी घ्या. तसेच लहान मुलांपासून तो दूर ठेवा. थंडीच्या दिवसात दारं, खिडक्या शक्यतो बंद ठेवा.
उबदार कपडे घाला
हिवाळ्यात बाळाला उबदार कपडे घाला. जाड स्वेटरऐवजी तुम्ही बाळाला थोडे हलके पण उबदार कपडे घाला, ज्यामुळे ते जास्त चिडचिड करणार नाही आणि थंडीपासूनही त्यांचे संरक्ष होईल. हिवाळ्यात पालकांनी बाळाच्या कपड्यांबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे.
कोमट तेलाना मसाज करा
बाळाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी रोज त्याला तेलाने मसाज करा. दररोज कोमट तेलाने मालिश केल्यास स्नायू मजबूत होतात. याबरोबर त्याचे शरीरही उबदार राहते. यामुळे तुमही मोहरीचे तेल किंवा तूप वापरु शकता.
थंडी लागणार नाही याची काळजी घ्या
हिवाळ्यात मुलाला थंड गोष्टींपासून दूर ठेवा. याशिवाय स्तनपान करणाऱ्या महिलांनी थंड पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
स्वच्छतेची काळजी घ्या
बाळांना विविध आजारांपासून दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. कारण घाणीमुळेही बाळ आजारी पडू शकते. अशा परिस्थितीत बाळाला व्हायरल इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य वेळी लसीकरण करा. तसेच सॅनिटायझरचा वापर करा.