Skin Care in Winter: थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि रूक्ष होण्याचा धोका असतो. या ऋतूमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे, त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी या दिवसांमध्ये तुमचे स्किनकेअर रूटीन परफेक्ट असणे गरजेचे आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.
आंघोळीपूर्वी काय करावे
आयुर्वेद सांगतो की प्रत्येकाने आंघोळ करण्यापूर्वी आपल्या शरीराला मॉइश्चराइज करावे. हिवाळ्यात अंघोळ करण्यापूर्वी तेल लावणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे त्वचेला लवचिकता मिळते आणि हिवाळ्यात त्वचा कोरडी होत नाही. आंघोळीपूर्वी शरीराला खोबरेल किंवा तिळाच्या तेलाने पूर्णपणे मसाज करा आणि आंघोळीनंतर शरीर पूर्णपणे पुसून टाका. असे केल्याने त्वचेला नैसर्गिकरीत्या ओलावा मिळतो आणि टॉवेलने शरीर पुसल्याने अतिरिक्त तेल निघून जाते.
आंघोळीपूर्वी त्वचेला तेल लावण्याचे ५ फायदे
१. हिवाळ्यात अंगावर तेल लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते आणि त्वचेला पोषण मिळते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा निरोगी होते.
२. आंघोळीपूर्वी शरीराला तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना खूप आराम मिळतो.
३. आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर तेल लावल्याने वृद्धत्वापासून सुटका मिळते. यामुळे चेहरा घट्ट होतो आणि सुरकुत्या दूर होतात.
४. थंडीत आंघोळीपूर्वी अंगाला तेल लावल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि थकवा दूर होतो.
हेही वाचा >> आवळ्याचे फायदे माहित असूनही आहारात समाविष्ट करत नाही का? मग, आवळ्याचे हे सहज तयार होणारे पदार्थ खा
५. आंघोळीपूर्वी अंगावर तेल लावल्याने सांधेदुखी आणि सूज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.