हिवाळ्यात आरोग्यासह त्वचेचीही विशेष काळजी घेण्याची गरज असते. या ऋतूमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.
कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
आणखी वाचा: ‘ही’ आहेत हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होण्याची कारणं; लगेच करा बदल
नारळाचे तेल
नारळाच्या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. कोरड्या त्वचेवर नारळाचे तेल उत्तम मॉइश्चरायजरचे काम करते. यासाठी झोपण्यापुर्वी नारळाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश करा.
मध
मध आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाते. ज्यांना त्वचा सतत कोरडी होते, त्वचेतील आद्रता कमी होते त्यांच्यासाठी मध फायदेशीर ठरते. मधाचा वापर केल्याने त्वचा मऊ आणि निरोगी राहते.
एलोवेरा
एलोवेराही त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर मानले जाते. अँटीबॅक्टरियल, अँटिसेप्टिक, अँटीऑक्सिडेंट यांसह विटामिन बी १, बी २, बी ६, बी १२ आढळते, जे त्वचेचा कोरडेपणा दुर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.