हिवाळा म्हणजे आरोग्यदायी वातावरण. हिवाळ्यात शरीर बांधणी वेगाने होते. नवीन पेशींची निर्मिती आणि वाढ वेगाने होते. शरीरांतर्गत क्रिया आणि देखभालीचं कामही वेगाने होतं. म्हणूनच भूक वाढते, अन्नपचन सुधारते. शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी जास्त उर्जेची गरज असते. म्हणून नेहमीपेक्षा ५ ते १० टक्के जास्ती कॅलरीजची शरीराला आवश्यकता असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शरीर बांधणीसाठी आवश्यक पदार्थ

भरपूर प्रोटीन्स देणारे पदार्थ. तेलबिया म्हणजे पांढरे आणि काळे तीळ, शेंगदाणे, जवस, सूर्यफुलाच्या बिया. सुकामेवा – बदाम, अक्रोड. सोयाबीन, पावटा, मसूर. अंडी, मासे, चरबी शिवाय चिकन, मटण.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ

थंडीत रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते, जंतू संसर्गाचा धोका वाढतो. म्हणून काही पदार्थ आहारात आवश्यक आहेत. आलं, सुंठ, लसूण, तुळस, गवती चहा असे औषधी पदार्थ जरुर घ्या. लवंग, मिरे, दालचिनी, मोहरी, हळद असे जंतुनाशक, प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ. ओवा, हिंग, मेथी दाणे यांमुळे, भूक वाढते, अन्नपचन सुधारते, रक्ताभिसरण वाढते.

ऊर्जा देणारे पदार्थ

गुळ, मध. बाजरी, मका, राजगिरा, शिंगाडा भरपूर उष्णता देतात. हळीव, डिंक यातून ऊर्जा मिळतेच आणि हाडांचं आरोग्य सुधारतं. खजूर, सुकं अंजीर,जर्दाळू, मनुका, खारीक उष्णता आणि खनिजं, व्हिटामिन्स, फायबर्स देतात. सुरण, रताळी, बटाटे अशी कंदमूळं आवश्य खावीत.

अँटीऑक्सिडंटस असलेले पदार्थ

आवळा, गडद रंगांच्या लाल पिवळ्या भाज्या आणि फळं. पालेभाज्या, मोडाची कडधान्ये, मटार, मुळा यांमधून; व्हिटामिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंटस मिळतात.

थंडीत केले जाणारे पारंपारिक पदार्थ

तिळगुळ, गुळाची पोळी, अळीवाचे/ डिंकाचे/ मेथीचे/ खजुराचे लाडू योग्य प्रमाणात आवर्जून खा. गजर हलवा, उंधियो, सरसों का साग, पाया सूप यांचा आस्वाद नक्की घ्या.

गरम पेय

अतिरेकी प्रमाणात चहा, कॉफी नको. त्याऐवजी सुप्स, हर्बल टी, डाळ सूप, काढा घ्या.पाणी भरपूर प्या. साधं पाणी प्यायलं जात नसेल तर गरम पाणी प्या.

तेल, तुपाचा वापर मर्यादेतच करा. गोड पदार्थांचा अतिरेक नको. ते पदार्थ पचण्यासाठी खूप वेळ आणि कार्यशक्ती खर्च होईल. शरीराचं तापमान कमी होईल.

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ