आपले डोळे आपल्या चेहऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. डोळे सुंदर दिसावे यासाठी काजळासोबत मस्काराही आवर्जून वापरला जातो. जसं काही मुली अगदी रोज काजळ लावतात तसचं मस्काराही लावतात. या मस्कारामुळे डोळ्यांना, त्यांच्या पापण्यांना त्रास होऊ शकतो. कारण शेवटी त्यामध्ये रासायनिक गोष्टी वापरलेल्या असतातच. मस्कारामुळे अनेकदा पापण्यांना त्रास होतो, पापण्यांचे केस गळतात, केस कोरडेही होतात. तर मस्कारा खूप वेळेसाठी डोळ्यांवर राहिल्यामुळे त्या भागावर खाजही सुटते. या गोष्टी होऊ नयेत यासाठी डोळ्यांची आणि त्यांच्या पापण्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
डोळ्यांसाठी या टिप्स नक्की फॉलो करा!
मॉइस्चरायझिंग-
आपल्या पापण्यांनाही हायड्रेशनची आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना नारळ तेल, एरंडेल तेल, जोजोबा तेल किंवा व्हॅसलीने मॉइस्चराइजर करा. असे केल्याने आपल्या पापण्यांनवरती एक थर निर्माण होईल त्यामुळे तुम्ही लावत असलेल्या मस्करामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.परंतु पापण्यांनवरती कोणतेही रासायनिक-आधारित मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन वापरू नका.
मस्कारा प्राइमर –
मस्कारा प्राइमर बाजारात सहज उपलब्ध आहेत. मस्करा प्राइमरमुळे पापण्यांनवरती मस्कारा व्यवस्थित लागतो. यामुळे पापण्यांना आणि मस्कारा यांच्यामध्ये एक लेअर तयार होतो. जो पापण्यांनसाठी फायदेशीर ठरतो. तुम्ही दररोज मस्करा वापरत असल्यास मस्कारा प्राइमर आवर्जून घ्या.
डोळे चोळू नकात-
दिवसभर डोळ्यांना मस्कारा लावलेला असला की डोळ्यांना चोळावेसे वाटेच. अशावेळी डोळा चोळू नकात.आधी मस्कारा काढा. कारण मस्कारा असतानाच तुम्ही डोळा चोळलात तर डोळ्यांखाली बारीक रेषा तयार होतात. सुरकुत्याही पडतात आणि पापण्या सुकलेल्या दिसतात.
एक्सप्रायरी तारीख तपासा-
म्स्कारांची एक लहान शेल्फ लाइफ असते म्हणून त्यांची एक्सप्रायरी तारीख आवश्य चेक करा. एक्सप्रायरी तारीख संपलेला मस्कारा चुकुनही वापरू नका कारण यामुळे डोळ्यांना मोठी हानी होऊ शकते. आपल्याकडे असलेला मस्कारा जमल्यास दर ६ महिन्यांनी बदला.
उत्तम आहार घ्या-
डोळ्यांसाठी आणि खासकरून पापण्यांनसाठी व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई सारख्या पोषक घटका असलेला आहार घ्या