Hair Care Remedy: कोरफड हा केसांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपायांपैकी एक मानला जातो. या आश्चर्यकारक वनस्पतीमध्ये केस निरोगी ठेवणारे अनेक गुणधर्म आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेसाठी तसेच केसांसाठी आरोग्यदायी मानले जातात. त्याचे मॉइश्चरायझिंग आणि संरक्षणात्मक गुणधर्म एकूण आरोग्यासाठी कमालीचे फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला ते तुमच्या केसांना कसे लावायचे हे माहित असेल तर तुम्ही केसांची चांगली वाढ करु शकता आणि तुमचे केस चमकदार आणि दाट करू शकता. केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोरफडीचा वापर शतकानुशतके केला जात आहे. कोरफडीचे केसांसाठी काय फायदे आहेत, हे बहुधा माहित असले, पण केसांच्या वाढीसाठी कोरफडीचा वापर कसा करावा हे तुम्हाला माहिती आहे का? नसल्यास, सर्वोत्तम आणि सोप्या पद्धती येथे जाणून घेऊ शकता.
केसांच्या वाढीसाठी कोरफडीचा वापर कसा करावा?
केसांसाठी कोरफड जेल आणि आल्याचा रस
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात. केसांच्या वाढीसाठी तुम्ही एलोवेरा जेल आणि आल्याच्या रसाचा स्प्रे बनवू शकता. स्प्रे बनवण्यासाठी, तुम्हाला फक्त अर्धा कप ताजे कोरफड जेल आणि एक चतुर्थांश कप ताजे आल्याचा रस ब्लेंडरमध्ये मिक्स करावे लागेल.
साहित्य चांगले मिसळेपर्यंत मिक्स करावे. पूर्ण झाल्यावर, हे मिश्रण स्प्रे बाटलीत ओता आणि संपूर्ण टाळूवर स्प्रे करा. सुमारे २० मिनिटे मसाज करा. तुम्ही ते रात्रभर ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचे केस धुवू शकता. हे आले हेअर स्प्रे ताजे आणि छान वास देणारे असू शकते.
केसांच्या वाढीसाठी कोरफड जेल आणि खोबरेल तेल
खोबरेल तेल तुमचे केस निरोगी, दाट आणि लांब होण्यास मदत करते. केसांच्या वाढीसाठी तुम्ही एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल वापरू शकता. ते एकत्र वापरण्यासाठी, तुम्ही प्रथम एक कप कोरफड व्हेरा जेल मिक्स करावे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
नीट मिसळून झाल्यावर एका सॉसपॅनमध्ये खोबरेल तेल आणि कोरफड जेल घाला. त्यात बुडबुडे येणे बंद होईपर्यंत मिश्रण गरम करा. झाल्यावर तेल थंड होऊ द्या. तेल गाळून बाटलीत साठवा. तुम्ही केस धुण्यापूर्वी ३ ते ४ तास आधी हा उपाय वापरू शकता.
हेही वाचा – दुधासह ‘हे’ पदार्थ तुम्हीही खाता का? आताच थांबवा, अन्यथा आजारी पडाल…
कोरफड जेल आणि व्हिनेगर हेअर मास्क
केसांच्या वाढीसाठी तुम्ही अॅपल साइडर व्हिनेगर वापरू शकता. हे बॅक्टेरिया काढून टाकून तुमची टाळू निरोगी ठेवते आणि पीएच पातळी संतुलन राखते.
केसांच्या वाढीसाठी एलोवेरा जेल आणि व्हिनेगर मास्क वापरण्यासाठी, तुम्ही प्रथम अर्धा कप ताजे कोरफड जेल आणि ३ चमचे अॅपल साइडर व्हिनेगर मिक्स करावे. चमच्याच्या मदतीने चांगले मिक्स करावे.
पूर्ण झाल्यावर स्प्रे बाटलीत ओता. ते तुमच्या टाळूवर तसेच केसांच्या लांबीवर लावा. डोक्याला हलके मसाज करा. धुण्याआधी ३ ते ४ तास तसंच राहू द्या.
हेही वाचा – वारंवार तोंड येतंय? तुमच्या शरीरात असू शकते व्हिटॅमिनची कमतरता; ‘या’ लक्षणांवरून ओळखा
केसांच्या वाढीसाठी एलोवेरा जेल आणि लॅव्हेंडर तेल
केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी लॅव्हेंडर प्रभावी आहे. त्यात प्रतिजैविक गुणधर्म देखील आहेत, याचा अर्थ ते बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास मदत करते. म्हणूनच केसांच्या वाढीसाठी तुम्ही एलोवेरा जेल आणि लॅव्हेंडर तेल वापरू शकता.
दोन्ही एकत्र वापरण्यासाठी, तुम्हाला अर्धा कप कोरफड व्हेरा जेल आणि १५ थेंब लॅव्हेंडर तेल मिसळावे लागेल. केस धुतल्यानंतर, केस आणि टाळूच्या संपूर्ण लांबीवर लावा. चांगल्या परिणामांसाठी हे नियमितपणे करा.