Lizard and Cockroach repellent Spray: घरात पाहुणे येणार म्हणजे स्वच्छतेची अगदी बारकाईने तपासणी केली जाते. पण असेही काही न बोलावलेले पाहुणे असतात जे तुमच्या घरी स्वच्छता नसेल तर पहिले घरात शिरतात. हे पाहुणे म्हणजे पाली, झुरळे आणि अनेक आजारांना कारणीभूत असणारे मच्छर. घरात एकदा का पालीचा शिरकाव झाला की मग अथक प्रयत्न करूनही पाल हाकलणे शक्य होत नाही उलट काही दिवसांनी पालीची पिल्लं येऊन आपली संख्या वाढवत जातात. अशावेळी कीटकनाशके, केमिकल युक्त स्प्रे मारून प्राण्यांना मारणे अनेकांना पटत नाही म्हणूनच काही घरगुती उपाय करून आपण पालींना न मारता त्यांना घरातून बाहेर काढू शकता.
आज आपण एक घरगुतीच पण नामी उपाय पाहणार आहोत ज्याने पालींना घरातून बाहेर काढणे अगदी सोप्पे होईल. तुम्ही घरात लसूण वापरता ना? लसणाच्या सालीचं काय करता? फेकून देता, बरोबर? पण यापुढे तुम्ही याच साली वापरून पालींना हाकलून लावू शकता. कसं ते जाणून घेऊयात, चला…
लसणाच्या सालीचा मॅजिक स्प्रे कसा बनवाल?
- तुम्ही जेव्हा लसूण सोलता तेव्हा त्याच्या साली फेकण्याऐवजी एका डब्ब्यात जमा करा.
- यानंतर कडुलिंबाचा पाला घ्या.
- कडुलिंबाचा पाला व लसणाच्या साली एका भांड्यात घेऊन गरम पाण्यात उकळवा.
- गरम पाण्यात त्याचा अर्क उतरल्यावर यामध्ये मिरचीचे देठ टाकून पुन्हा एक उकळी काढून घ्या.
- तयार पाणी एका बॉटल मध्ये घेऊन त्यावर स्प्रे लावा
- हा स्प्रे घरात जिथे पाल सतत दिसते तिथे दिवसातून दोनदा मारा.
Home Remedies: पावसाळ्यात घराच्या भिंती ओल धरतायत? ‘या’ सवयी आजच थांबवा
दरम्यान अनेकजण घरात पालीला रोखण्यासाठी अंड्याची सालं वापरतात पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर फक्त पालींसाठी तुम्हाला अंडी आणायची तसदी घेण्याची गरज नाही. लसणाच्या सालीचा हा स्प्रे जिथून पाली येतात तिथे मारल्यास पाल घरात येण्याचे प्रमाणही कमी होईल.