ऑक्टोबर हिट हा अगदी मे महिन्यासारखा अंगाची लाहीलाही करणारा महिना नसला तरी अंगाला झोंबणारा असतो. या महिन्यात ऊन आणि थंडी हे दोन्ही ऋतू अनुभवायला मिळतात. या ऑक्टोबरच्या महिन्यात दिवसा ऊन आणि रात्री वातावरणात गारवा जाणवायला लागतो. ऑक्टोबर हिट हा उन्हाळ्याप्रमाणे वाटत नसला तरीही त्याचे परिणाम आपल्या शरीरावर तसंच त्वचेवर जाणवतात. कारण ऑक्टोबर हिट हा त्वचेला झोंबणारा असा महिना असतो. त्यामुळे आपल्या कोमल त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडायचं झालंच तर सनस्क्रीन वापरा असा सल्ला दिला जातो. मार्केटमध्ये आज इतक्या प्रकारची सनस्क्रीन लोशन्स उपलब्ध आहेत की त्यातलं नेमकं कुठलं वापरावं, त्याचा वापर कसा करावा याचा गोंधळ होतो. आज आम्ही सांगत आहोत नक्की सनस्क्रीनचा वापर कसा करावा?
उन्हाळ्यात सूर्याची किरणे प्रखर असतात. सनटॅन शरीराला एक संरक्षण देते, पण जेंव्हा सूर्याची प्रखर किरणे त्वचेच्या नाजूक पेशींवर जास्त होतात तेंव्हा सनबर्न होते. आपल्या शरीरात एक नैसर्गिक सनस्क्रीन असते, त्यास मिलेनीन असे म्हणतात. मिलेनीन ची साठवण जास्त प्रमाणात झाल्यास सनबर्न होते. त्वचेतील जिवंत पेशींना सनबर्नमुळे इजा होते आणि यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.
प्रख्यात त्वचारोगतज्ज्ञ डॉ. माधुरी यांनी इन्स्टाग्रामवर या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी एक पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी सनस्क्रीनचे महत्व आणि त्याचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलंय. यात सनस्क्रीन लावताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत याबाबतही त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
त्वचेवरील सन टॅन हे अनेकदा पॅची आणि अनियमित असू शकतात. त्वचेवरील हे सनटॅनचे डाग त्वचेवर परिणाम करत असतात. याचे परिणाम दीर्घकाळापर्यंत राहू शकतात आणि यात होणारं त्वचेचं नुकसान भरून काढणं हे काही सोपं नाही. म्हणूनच सगळ्यात प्रथम तुमच्या त्वचेसाठी सर्वात उत्तम क्रीम तेच जे जास्तीत जास्त वेळ तुमच्या त्वचेचं सूर्यप्रकाशापासून संरक्षण करतील.
या गोष्टी लक्षात ठेवा:
१. प्रत्येक ऋतूत सनस्क्रीन गरजेचे: सनस्क्रीन हे वर्षातील ३६५ दिवस त्वचेसाठी आवश्यक असतं. अगदी पावसाळ्याच्या दिवसातही. सुर्याची अतिनील किरणे पावसाच्या ढगांमधून जाऊ शकतात आणि त्यामुळे वृद्धत्व आणि हायपरपिग्मेंटेशन सारखे त्रास जाणवू लागतात.
२.सर्व उघड्या त्वचेवर सनस्क्रीन लावा: चेहरा, मान, कान, हात, हात आणि पाय अशा सर्व अवयवांवरीव त्वचेसाठी सनस्क्रीन महत्त्वाचं आहे. कारमध्ये बसल्यावरही सूर्याची किरणे अगदी कारच्या खिडक्या आणि विंडशील्डमधून येत असतात. त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. म्हणूनच, तुम्ही जिथे जाल तिथे सनस्क्रीन लावणे महत्वाचे आहे.
३. जास्तीत जास्त वेळ सनस्क्रीन वापरा: अनेकांना असं वाटतं की, दिवसातून एकदाच सनस्क्रीन लावणं पुरेसं असतं. तुम्हीही असं करत असाल तर हे अत्यंत चूकीचं आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. हे ही लक्षात ठेवा की, बाहेर पडण्याच्या आधी १५ ते २० मिनीटं आधीच सनस्क्रीनचा वापर करा. सनस्क्रीन तुमच्या त्वचेमध्ये शोषून गेल्यानंतर त्याचा परिणाम जाणवू लागतो.
४. सनस्क्रीनमध्ये यूव्हीए फिल्टर असणं गरजेचं: बर्याच सनस्क्रीनमध्ये फक्त एक यूव्हीबी फिल्टर असतो. परंतु आपल्याला यूव्हीबीसोबतच यूव्हीए किरणांपासून सुद्धा स्वतःचं संरक्षण करणं देखील आवश्यक आहे. सनस्क्रीनमध्ये यूव्हीए असणं आवश्यक आहे. कारण UV-A सुर्य प्रकाशामुळे पिंगमेंटेशन,मार्क्स,फ्रॅकल्स,एजिंग व अॅलर्जी निर्माण होऊ शकते.
५. एक्सपायर्ड सनस्क्रीन वापरणे टाळा: बऱ्याच सनस्क्रीनमध्ये १२ महिन्यांचं शेल्फ लाइफ असतं. १२ महिन्यांनंतर या सनस्क्रीनचा प्रभाव नष्ट होतो. सनस्क्रीन कालबाह्य झाल्यानंतर रसायने कमी होण्यास सुरवात होते. त्यामुळे ते कमी प्रभावी ठरतात. त्याच्या मुदतीची तारीख असूनही अत्याधिक तापमानात ठेवल्याने देखील सनस्क्रीन कमी प्रभावी होऊ शकतात हे लक्षात ठेवा.
६. दीड ते दोन तासांपेक्षा जास्त उन्हात राहू नका: पहिल्यांदा टॅनर वापरणाऱ्या लोकांसाठी, ते 20 मिनिटे टॅन करू शकतात आणि प्रत्येक वेळी पाच ते दहा मिनिटांनी वाढवू शकतात.