साडी म्हणजे स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक साडीबरोबर स्त्रियांचे एक भावनिक नाते जोडेलेले असते, त्यामुळे प्रत्येक साडी आपल्याबरोबर कायम असावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण बऱ्याचदा साड्या धुताना खराब होतात, त्यांचा रंग फिकट होतो किंवा त्यांना योग्य पद्धतीने न धुतल्याने डिझाईन देखील खराब होते. अशावेळी इच्छा असतानाही ती साडी पुन्हा वापरता येत नाही. हे टाळण्यासाठी सिल्क साड्या धुताना तुम्ही काही टिप्स वापरल्या तर त्या खराब होणार नाहीत. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.
सिल्क साड्या धुताना वापरा या सोप्या टिप्स
थंड पाणी वापरा
सिल्क साडी धुताना गरम पाण्याचा वापर चुकूनही करू नका. कारण त्यामुळे साडीची चमक आणि रंग दोन्ही फिकट होतात. म्हणून गरम पाणी न वापरता थंड पाणी वापरावे. धुण्यापुर्वी काही वेळासाठी थंड पाण्यात सिल्क साडी भिजत ठेवा.
आणखी वाचा: लहान मुलं, वयस्कर व्यक्तींनी दूध कधी प्यावे? जाणून घ्या वयानुसार कोणत्या वेळी दूध पिणे ठरते फायदेशीर
व्हिनेगर वापरा
जर थंड पाण्यात भिजवल्यानंतरही सिल्क साडीवरील डाग निघाले नाहीत, तर तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. १ बादली पाण्यात २ चमचे व्हाईट व्हिनेगर टाका. नंतर या पाण्यात सिल्क साडी १५ मिनीटांसाठी भिजत ठेवा. यामुळे साडीवरील डाग निघून जातील.
माईल्ड डिटर्जंट वापरा
केमिकल असणारे डिटर्जंट सिल्क साडी धुताना वापरले तर त्या साडीचा रंग फिकट होऊ शकतो. त्यामुळे माईल्ड डिटर्जंटचा वापर करा. यामुळे साडीची चमक आणि रंग तसाच राहील.
आणखी वाचा: रामफळ खाणे आरोग्यासाठी ठरते फायदेशीर; आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
सिल्क साडीवर असणाऱ्यांना लेबलमध्ये ती कशी धुवावी याबाबत सूचना दिलेल्या असतात. साडी चांगली राहावी यासाठी या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते. यासह सिल्क साडी धुतल्यानंतर उन्हात सुकवू नका, कारण उन्हामुळे रंग आणि चमक फिकट होऊ शकते. त्यामुळे सिल्क साडी सावलीत सुकवावी.