How To Wash Period Underwear: अंडरवेअर्स या शरीराच्या सर्वात नाजूक भागाला स्पर्श करणाऱ्या कापडाची स्वच्छता अत्यंत बारकाईने व काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. अन्यथा यातून पुढे जाऊन अनेक संसर्ग तसेच त्रास उद्भवू शकतात. विशेषतः महिलांनी मासिक पाळीच्या दिवसात वापरल्या जाणाऱ्या अंडरवेअर्स धुताना खास काळजी घ्यावी असावा सल्ला दिला जातो. अलीकडे मासिक पाळीत पॅड्स, टॅम्पॉनस या गोष्टींना पिरियड पॅंटी हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. कोणत्याही अतिरिक्त साधनांची मदत न घेता नियमित अंडरवेअर प्रमाणे वापरायचा हा पर्याय महिलांना कम्फर्ट अनुभवण्याची संधी देतो. पण अनेकदा या पॅंटी नीट न धुतल्यास यामुळेही संसर्गाचा धोका वाढतो. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अंडरवेअरची स्वच्छता नेमकी कशी करावी, यावर डाग पडू नये म्हणून काय करता येईल हे आता आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मासिक पाळीत वापरलेल्या अंडरवेअर कशा स्वच्छ कराव्या?

  • शक्यतो थेट गरम पाण्याने अंडरवेअर स्वच्छ करू नका अन्यथा डाग सेट होऊ शकतात, याऐवजी आधी थंड किंवा साध्या पाण्याने धुवून घ्या व मग गरम पाण्यात भिजवा.
  • तुम्ही अत्यंत सौम्य फॅब्रिक सॉफ्टनर किंवा साबण वापरू शकता. रोजच्या कपड्यांना वापरायची डिटर्जंट पावडर वापरूच नका.
  • बेसिन मध्ये किंवा एखाद्या टपात ३० मिनिटे अंडरवेअर भिजवून ठेवा व मग हलक्या हाताने घासून स्वच्छ करा.
  • वॉशिंग मशीनच्या ड्रायरपेक्षा साध्या हवेवर अंडरवेअर वाळत घाला. थेट सूर्यप्रकाशात ठेवण्याची गरज नाही पण हवेशीर ठिकाणी सुकवा.
  • सुकल्यावर फोल्ड करून कोरड्या जागी ठेवा नियमित कपड्यांपासून मासिक पाळीत वापरल्या जाणाऱ्या अंडरवेअर वेगळ्या ठेवा.
  • डाग निघत नसल्यास आपण लिंबाचा रस किंवा हायड्रोजन पेरॉक्ससाईड वापरू शकता यात नैर्सर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असल्याने नुकसान होण्याची शक्यता कमी असते.

हे ही वाचा<< अंतर्वस्त्राचा रंग धुतल्यावर पांढरा- पिवळा का पडतो? शास्त्रीय कारण व उपाय काय?

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to wash underwear perfectly used in periods remove blood stains and bad smell from panties with easy hacks svs
Show comments