Viral Video : काही दिवसांवर दिवाळी आहे.सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. कपड्यांपासून फराळापर्यंक काय सर्व जण तयारीमध्ये मग्न आहे. दिवाळीत पारंपारिक कपडे घालण्याचा तुम्ही विचार करताय का? खरं तर मुलींना पारंपारिक कपड्यांमध्ये बरेच ऑप्शन असतात पण मुलांना किंवा पुरुषांना नसते. पण आज आम्ही पुरुषांना पारंपारिक धोतर कसे नेसायचे, हे सांगणार आहोत.
धोतर कसे नेसायचे, या वर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये साडीपासून धोतर कसे नेसायचे, हे दाखवले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण धोतर कसे नेसायचे सांगत आहे. धोतर नेसणे ही सुद्धा कला आहे. धोतर नेसायला शिकण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ नीट पाहावा लागेल. धोतर बाजारात सुद्धा मिळतं किंवा तुम्ही घरगुती पैठणी साडीचे सुद्धा धोतर नेसू शकता.
दिवाळीत जर तुम्हाला पारंपारिक लूक करायचा असेल तर धोतर विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे पैठणी साडीचे सुंदर धोतर नेसू शकता. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा