Vegan Eggs:अंडी हा असाच एक खाद्य पर्याय आहे जो प्रथिनांनी परिपूर्ण आहे. परंतु शाकाहारीपणा काही काळापासून खूप लोकप्रिय झाला आहे, ज्यामुळे लोक आता मांसाहारी पदार्थांपासून मिळणाऱ्या प्रथिनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरीरात प्रथिनांची कमतरता होता नये, म्हणून अनेक ब्रँड वनस्पती आधारित मांस, आईस्क्रीम आणि इतर गोष्टी बाजारात आणत आहेत. हे प्रथिने पर्याय तुमच्या शरीराला आवश्यक पोषण कमी होण्यापासून रोखतात. बाजारात तुम्हाला शाकाहारी अंडी देखील मिळतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत शाकाहारी अंडी?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाकाहारी अंडी कशापासून बनतात?

शाकाहारी अंड्यांवर मूग, सोया अर्क, कडधान्ये, वाटाणे, चणे आणि इतर काही वनस्पती स्रोत टाकून प्रक्रिया केली जाते. कोंबडीच्या अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये हळद देखील घातली जाते. हे शाकाहारी अंडे अगदी कोंबडीच्या अंड्यासारखे दिसते, ज्याच्या मदतीने विविध प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. ते तुम्ही भुर्जीपासून ऑम्लेटपर्यंत तयार करू शकता. हा शाकाहारी अंड्याचा पर्याय कोंबडीच्या अंड्यासारखा दिसण्यासाठी आणि चवीसाठी डिझाइन केला आहे.

( हे ही सांगा: Blood Sugar Control: रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांचे ४ आजार होऊ शकतात; जाणून घ्या यांना कसे टाळावे)

शाकाहारी अंड्यांचे फायदे

  • शाकाहारी अंडी कोंबडीच्या अंड्यांसारखी असतात. विशेषतः हे शाकाहारी लोकांसाठी उत्तम आहेत, जे आहारात अंडी खाण्यास असमर्थ होते.
  • दुसरी चांगली गोष्ट म्हणजे वनस्पती-आधारित प्रथिनेंप्रमाणे ते कोलेस्टेरॉल-मुक्त असतात.

शाकाहारी अंड्यांचे तोटे

  • वनस्पती-आधारित अंडी खऱ्या अंड्यांसारखी दिसायला आणि चवीची असू शकतात, परंतु त्यांची प्रथिने पातळी कमी असते.
  • शाकाहारी अंडी एक प्रकारचे प्रक्रिया केलेले अन्न आहे, त्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत.
  • सर्व कोंबडीच्या अंड्यांचे पौष्टिक मूल्य सारखेच असते, परंतु शाकाहारी अंड्यांचे पौष्टिक मूल्य ब्रँडनुसार बदलते.
  • शाकाहारी अंडी बाजारात नवीन असल्याने ती नेहमीच्या अंड्यांइतकी सहज उपलब्ध होत नाहीत.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How vegan eggs are different from original egg know everything about them gps