HP कंपनीने लॅपटॉप Envy चा नवीन पोर्टफोलिओ लॉंच केला आहे. ENVY 14 आणि ENVY 15 नोटबुक असे दोन लॅपटॉप लॉंच करण्यात आले आहे. १४ इंच आणि १५ इंचाचे हे लॅपटॉप असून यामध्ये 11th जेनरेशन इंटेल चिपसेट आणि NVIDIA ग्राफिक्स कार्डने सुसज्ज केले आहे. HP च्या ENVY पोर्टफोलिओला या वर्षाच्या अखेरीस Windows 11ची अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे. ग्राहक HP वर्ल्ड स्टोअर्स, रिलायन्स, क्रोमा आणि अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या मोठ्या ई-कॉमर्स साइट्सवरून तुम्ही HP चे हे लॅपटॉप सहज खरेदी करू शकतात.
या लॅपटॉपच्या खरेदीवर तुम्हाला ४,२३० रुपयांपर्यंत १ महिन्याची कॉम्प्लिमेंटरी Adobe सॉफ्टवेअर ऑफर करत आहे. जी Adobe कडून २०+ सर्जनशीलता आणि प्रोडक्टिविटी सॉफ्टवेअरवर उपलब्ध करून देत आहे. याशिवाय इतर HP लॅपटॉपच्या एक्सचेंजवर ग्राहकांना १५,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.
किंमत आणि वैशिष्ट्ये
१,०४,९९९ रुपयांपासून सिल्वर रंगाच्या पर्यायामध्ये ग्राहकांना HP ENVY १४ खरेदी करता येणार आहे. तसेच HP ENVY १५ हा लॅपटॉप सुद्धा सिल्वर रंगाच्या पर्यायामध्ये १,५४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. यात HP Envy 14 आणि HP Envy 15 या दोन्ही लॅपटॉपच्या डिस्प्लेवर फोकस करण्यात आला आहे. याबरोबर १००% SRGB सपोर्टसह ‘बेस्ट इन क्लास’ रंग अचूकतेसह हा डिस्प्ले येणार आहे. HP Envy १४ मध्ये १४-इंचचा पॅनल आहे. तर HP Envy १५ मध्ये १५-इंच डिस्प्ले आहे. लॅपटॉप दोन्ही मध्ये १६:१० च्या डिस्प्लेसह 400 निट्स च्या पीक ब्राइटनेस या लॅपटॉप मध्ये आहे.
HP Envy१४ या लॅपटॉपमध्ये Nvidia GeForce GTX 1650 Ti Max-Q ग्राफिक असणार आहे. तर HP Envy 15 मध्ये Nvidia GeForce RTX 3060 Max-Q GPU ग्राफिक असणार आहे. हे दोन्ही लॅपटॉप मध्ये १६ तासांची बॅटरीची लाइफ देण्याचा दावा करण्यात आला आहे. या दोन्ही लॅपटॉप मध्ये Thunderbolt 4 पोर्ट, USB-A पोर्ट्स, तसेच ३.५ मिमी हेडफोन जैक, ब्लूटूथ, WiFi असे कनेक्टिव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहे.