तुम्हाला एखादा असा फिटनेस बॅंड हवा असेल ज्याची किंमत जास्त नसेल आणि दिसायला देखील स्टायलिश असेल तर ह्युवेई या कंपनीने नवीन स्मार्ट बँड ‘Huawei Band 6’ लॉन्च केला आहे. या फिटनेस बॅंडची डिझाईन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली आहे. याचा लुक फिटनेस बॅंड ऐवजी स्मार्टवॉच सारखा आहे. जर तुम्ही आरोग्याची विशेष काळजी घेत असाल तर हा फिटनेस बॅंड तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या बॅंडमध्ये अनेक हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स उपलब्ध आहे. या फिटनेस बॅंड मध्ये SpO2 , हार्ट रेट सेन्सर, स्ट्रेस मॉनिटरिंग यासारख्या उत्तम फीचर्सही देण्यात आल्या आहेत. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हृदयाचे ठोके जास्त झाल्यास किंवा कमी झाल्यास बॅंड वापरकर्त्यास सतर्क करतो.
‘Huawei Band 6’ची वैशिष्ट्ये :
फिटनेस बॅंड हा टच स्क्रीन असणार असून बॅंड वापरताना तुम्हाला स्मार्टफोन वापरत असल्यासारखेच जाणवणार आहे. या फिटनेस बॅंडमध्ये १.४७ इंचाचा फुल-व्यू डिस्प्ले असून या बॅंडची स्क्रीन-टू-बॉडी रेशोमध्ये आहे. तर या बॅंडची २८२ इंच इतकी पिक्सेल डेन्सिटी आहे. या बॅंडमधील टाइम मॉनिटरमुळे हे SpO2 म्हणजे ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवते. फिटनेस बँड दिवसभर SpO2 चे शरीरातील फिटनेसवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी पावर-सेविंग एल्गोरिथमने सुसज्ज आहे.
या बॅंडद्वारे स्मार्टफोन सारखे तुम्ही फोन कॉल उचलू किंवा कट करू शकता. तसेच दररोज तुम्ही या बॅंडमधून गाणी ऐकू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या फोनचा कॅमेराही एक्सेस करू शकता. ह्युवेईचा असा दावा आहे की या बँडची बॅटरी सतत हृदयगतीवर लक्ष ठेऊन असते आणि SpO2 मॉनिटरिंगसह एकदा चार्जिंग केल्यानंतर बॅटरी १४ दिवस काम करू शकते. सायकलिंग, आउटडोअर आणि इनडोअर गेमसह चाइल्ड गेम्स, फिटनेस , डान्सिंग अॅक्टिविटीजला ट्रॅक करण्यासाठी ८५ कस्टमाइज्ड मोड्स या बॅंडमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. तर हा बॅंड हातात घातल्यावर कोणत्याही प्रकारच वजन जाणवणार नाही. कारण या बॅंडचे वजन १८ ग्रॅम इतकेच आहे.
‘Huawei Band 6’ भारतीय किंमत :
हुआवेई स्मार्ट बँडचा Amazon प्राईम टाइम डे सेल मधला आजचा शेवटचा दिवस आहे. तर ग्राहकांनी लवकरच फिटनेस बॅंड बूक करून घ्या. भारतात या बॅंडची किंमत ४,४९० रुपये इतकी आहे. या बँडबरोबर एक आकर्षक ऑफरही देण्यात आली आहे. तर हा बॅंड खरेदी करताना ग्राहकांना १,९९० रुपये किंमतीची हुआवेई मिनी ब्लूटूथ स्पीकर मोफत देण्यात येणार आहे. हा बॅंड अंबर सनराईज, फॉरेस्ट ग्रीन, ग्रेफाइट ब्लॅक आणि साकुरा पिंक या चार स्टाइलिश रंगात खरेदी करता येईल.