Huawei कंपनीने नवीन स्मार्टवॉच GT2e चीनमध्ये एका ऑनलाइन इव्हेंटद्वारे लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये अॅमोलेड डिस्प्ले, विविध स्पोर्ट्स मोड आणि दमदार कनेक्टिव्हिटीचे फीचर्स देण्यात आले आहेत. यापूर्वी कंपनीने GT2 स्मार्टवॉच लाँच केले होते.
कंपनीने नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.39 इंच अॅमोलेड डिस्प्ले दिला असून 4जीबी स्टोरेज आणि Kirin A1 प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. याशिवाय युजर्स या वॉचमध्ये सहजपणे 500 गाणी इंस्टॉल करु शकता. तसेच या स्मार्टवॉचला 30 तासांचा बॅटरी बॅकअप असल्याचा कंपनीचा दावा आहे. 100 पेक्षा जास्त वर्क आउट मोड फीचर्स यामध्ये आहे. यात स्केटबोर्डिंगपासून रॉक क्लाइंबिंग मॉनिटरिंग यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. पहिल्यांदाच कंपनीने ब्लड ऑक्सिजन सॅचुरेशन (SpO2) मॉनिटरिंग फीचरही दिले आहे.
Huawei GT2e स्मार्टवॉच भारतात विक्रीसाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही. पण लवकरच हे स्मार्टवॉच भारतातही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Huawei GT2e स्मार्टवॉचची किंमत 200 यूरो (जवळपास 16 हजार 512 रुपये) ठेवण्यात आली आहे.