Ice Facial : प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा सुंदर दिसावा. चेहऱ्यावर मुरुम, काळे डाग नसावे. ग्लोइंग स्कीनसाठी अनेकजण वाट्टेल ते प्रयत्न करतात, पण अनेकदा खूप प्रयत्न करूनही काहीही फरक दिसून येत नाही.
तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, चेहऱ्यावर बर्फाने मसाज केला पाहिजे; पण खरंच बर्फाचा मसाज फायदेशीर आहे का? यामुळे कोणते फायदे होतात? आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नियमित बर्फाने मसाज केल्यामुळे ग्लोइंग स्कीन दिसून येते. स्कीन हेल्दी आणि चमकदार दिसून येते. स्कीन केअरचा हा एक उत्तम पर्याय आहे, यामुळे चेहऱ्यावरील मुरुमसुद्धा दूर होतात.

हेही वाचा : Knife Sharpening : स्वयंपाकघरातील सुरी-विळीची धार गेली आहे का? भाजी कापताना त्रास होतोय? हे सोपे घरगुती उपाय करून पाहा

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम असेल तर बर्फाचा मसाज करा. बर्फाचा मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होऊ शकते. मुरुमसुद्धा हळू हळू कमी होऊ शकतात.

खूप जास्त स्क्रीन पाहणे, कमी झोप किंवा तणावामुळे डार्क सर्कल येतात. डोळ्याखाली येणारे हे डार्क सर्कल घालवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर एकदा बर्फाचा वापर करून पाहा. बर्फ लावल्याने डार्क सर्कल कमी होतात आणि डोळ्याची सूजसुद्धा कमी होते.

अनेकदा उन्हात गेल्यामुळे स्कीन कोरडी होते आणि स्कीनवर रॅशेज येतात, पण चेहऱ्यावर बर्फाचा मसाज केल्यानंतर तुम्हाला फरक दिसून येईल आणि रॅशेजपासून आराम मिळेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)