रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आयडीयाने आपला नवीन प्लॅन लाँच केला आहे. आयडीयाच्या प्रीपेड यूजर्ससाठी इंटरनेटचा हा प्लॅन म्हणजे खऱ्या अर्थाने धमाका असेल. यूजर्सला ८४ दिवसांसाठी १२६ जीबी डेटा मिळणार आहे, तोही ६९७ रुपयांमध्ये. आयडीया यूजर्सना ८४ दिवस रोज १.५ जीबी डेटा वापरता येणार आहे. याशिवाय यामध्ये लोकल-एसटीडी अनलिमिटेड कॉलिंगही असणार आहे. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, या नव्या इंटरनेट प्लॅनमुळे ग्राहक नक्कीच खूश होतील.
रिलायन्स जिओने मोबाईल यूजर्सना धमाकेदार ऑफर्स देऊन आकर्षित केले. काही दिवसातच कंपनीने आपला मोबाईल फोनही बाजारात दाखल होणार असल्याचं जाहीर केलं आणि त्याचं बुकींगही सुरु झालं. कंपनीच्या मोबाईल मार्केटमधील आक्रमक पवित्र्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे मात्र धाबे दणाणले. यामुळे त्यांनी नवीन मोबाईलची मॉडेल तर लाँच करण्याच्या घोषणा केल्याच पण जिओच्या कार्डमुळे इतर कंपन्यांनीही आपले स्वस्तातील प्लॅन्स घोषित करण्यास सुरुवात केली.
गुगलचे ‘तेज’ पेमेंट अॅप लवकरच तुमच्या मोबाईलमध्ये!
एअरटेल आणि जिओनेही याआधीच आपले ८४ दिवसांसाठीचे प्लॅन लाँच केले आहेत. ज्यामध्ये यूजर्सला दररोज १ जीबी डेटा वापरता येणार असून या प्लॅन्सची किंमत ३९९ रुपये इतकी आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या तुलनेत आयडीयाचा प्लॅन काही प्रमाणात महाग असल्याचेही बोलले जात आहे. याशिवाय जिओतर्फे ग्राहकांना ३९९, ३४९ असे इंटरनेट प्लॅन आणि कॉलिंग तसेच मेसेजिंगसाठीही इतर अनेक प्लॅन्स देण्यात आले आहेत.