Real Or Fake Besan: : प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात बेसन पीठ हे हमखास असते. बेसनापासून अनेक पाककृती बनवता येतात. हरभरा किंवा चणा डाळीच्या पीठाला बेसन म्हणतात. बेसन हे पौष्टिक घटकांनी समृद्ध मानले जाते. बेसनाचे भजी जवळजवळ प्रत्येक भारतीय घरातील पहिली पसंती आहेत. बेसनाचा वापर भाजी, फससान-नमकीन पदार्थ आणि गोड पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बेसनामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर महत्त्वाची खनिजे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तुम्ही जर बाजारातून बेसन विकत घेत असाल तर तुम्ही खरेदी करत असलेले बेसन भेसळयुक्त असू शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, बाजारात मिळणाऱ्या बेसनामध्ये अनेक प्रकारची भेसळ असते. जर तुम्हाला शुद्ध बेसन विकत घ्यायचे असेल आणि ते कसे ओळखायचे हे जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही मदत करणार आहोत. बाजारात मिळणारे बेसन भेसळयुक्त आहे की अस्सल हे तुम्ही सहज ओळखू शकता. तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त किचनमध्ये असलेल्या काही गोष्टींचा वापर करून फरक पाहा. चला तर मग उशीर न करता बेसन कसे ओळखायचे ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भेसळयुक्त बेसन पीठ कसे ओळखावे?
१.लिंबू
लिंबू वापरून भेसळयुक्त बेसन ओळखता येते. तुम्हाला फक्त दोन चमचे बेसनामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळायचा आहे. तसेच त्यात दोन चमचे हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका. ५-७ मिनिटे सोडा. जर काही वेळाने बेसन लाल किंवा तपकिरी दिसू लागले तर तुमचे बेसन भेसळयूक्त असू शकते. अशा बेसनाचा वापर टाळा.

हेही वाचा – “घरच्या तूपाला तोड नाही” आजीबाईंनी सांगितली खमंग साजूक तुपाची रेसिपी, जाणून घ्या खास टिप्स; पाहा Viral Video

२. हाइड्रोक्लोरिक ॲसिड
हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या मदतीने तुम्ही खोटे आणि खरे बेसन ओळखू शकता. यासाठी एका भांड्यात दोन चमचे बेसन घेऊन त्यात दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट बनवावी. या पेस्टमध्ये दोन चमचे हायड्रोक्लोरिक ॲसिड मिसळा आणि काही वेळ राहू द्या. बेसनाचा रंग लाल दिसला तर समजून घ्या की बेसन भेसळयूक्त आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Identify real or fake chickpea flour how to identify whether besan flour is adulterated or not learn simple tricks snk