Idli Batter : अनेकांना साउथ इंडियन पदार्थ खूप आवडतात. सर्वच राज्यांत इडली, डोसा आवडीने खाल्ला जातो. काही लोक बाहेर खाण्यापेक्षा घरीच इडली डोसा बनवतात. इडली डोसा बनवण्यासाठी पीठ आंबवले जाते. आंबवलेल्या पिठापासून बनवलेला इडली आणि डोसा चवीला अधिक चविष्ट वाटतो; पण तुम्ही इडली डोसा स्वादिष्ट व्हावा म्हणून पीठ किती दिवस आंबवता? जास्त दिवस पीठ आंबवण्याची तुम्हाला सवय असेल, तर ती आताच थांबवा. आज आपण याचे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदर्भात डॉ. संचारी दास यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी माहिती दिलीय की, इडली, डोसाचे पीठ कसे आणि किती दिवस आंबवावे.
त्या सांगतात, “इडली, डोसासाठी शिळे किंवा खूप जास्त दिवस आंबवलेले पीठ वापरू नका. आयुर्वेदानुसार, चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही नियमित ताजे अन्न खायला हवे.
हल्ली इडली डोसा स्वादिष्ट व्हावा म्हणून पीठ १०-१४ दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेवतात. अनेकांना वाटतं की, फ्रिजमध्ये इडली डोशाचं पीठ ठेवलं, तर आंबण्याची प्रक्रिया थांबते; पण खरे तर ही प्रक्रिया पूर्णपणे थांबत नाही. पीठ आंबण्याची प्रक्रिया हळूहळू कमी होते आणि त्यामुळे पीठ आणखी शिळं होतं.”त्या पुढे सांगतात, “आंबवलेलं पीठ आणि शिळेशं पीठ यात फरक आहे. आंबवलेल्या पदार्थांत अतिजास्त प्रमाणात जीवाणू निर्माण झाले की, अन्न पचणं अवघड होतं. त्यामुळे पोटाचे आजार किंवा अपचन यांसारख्या समस्या उदभवतात.”

हेही वाचा : Best Navratri Dress Ideas : नवरात्रीत युनिक, ग्लॅमरस लूक मिळेल; गरबा खेळताना उठून दिसाल, फॉलो करा ‘हे’ एकापेक्षा एक भारी फॅशन ट्रेंड

शिळे पीठ कसे ओळखायचे?

शिळे पीठ ओळखण्यासाठी डॉ. दास यांनी तीन टिप्स सांगितल्या आहेत.
१. पिठाचा उग्र वास येईल.
२. पीठ चवीला खूप जास्त आंबट वाटेल.
३. पिठात तेलासारखा पातळ थर जमा होईल.

dr.sancharidas या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरनं लिहिलंय, “धन्यवाद! सोशल मीडियावर अनेक व्हिडीओंमध्ये इडली, डोशाचं पीठ १० दिवस फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी सांगितलं जातं. पण, तुम्ही खरंच खूप चांगली माहिती दिली.”