दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिव्यांची आणि आनंदाची उधळण करणारा हा सण. यंदा दिवाळी २१ ऑक्टोबर पासून २६ ऑक्टोबरपर्यंत आहे. दिवाळीत फराळ, सजावटीसोबतच घराची साफसफाई देखील केली जाते. यातच महत्वाचं म्हणजे, घरातील देवघर स्वच्छ करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. ज्यामुळे प्रसन्नतचं वातावरण निर्माण होतं. मात्र, देवाऱ्यातील मूर्तींवर एक थर चढलेला असतो, जो सहजासहजी स्वच्छ होत नाही. कितीही काढण्याचा प्रयत्न केला तरी मूर्तींवरचे डाग काढणं कठीण होतं. मात्र, आता चिंता करु नका. देवघरातील मूर्तीं तुम्ही पुन्हा नव्याने आकर्षक बनवू शकता. जाणून घ्या काही सोप्या टिप्स…
मूर्ती स्वच्छ करण्यासाठी टिप्स
- लिंबू
देवाच्या मूर्तींवर साचलेली धूळ साफ करण्यासाठी स्वच्छ पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि लिंबाच्या सालीने पुसून मूर्ती स्वच्छ करा.
- लिंबू आणि बेकिंग सोडा
लिंबू आणि बेकिंग सोडा वापरून मूर्ती स्वच्छ करु शकता. अर्ध्या लिंबाचा रस एक चमचा बेकिंग सोडामध्ये मिक्स करा आणि मऊ कापडाच्या मदतीने मूर्तीवर लावा.
आणखी वाचा : या दिवाळीत स्वयंपाक घरातील उपकरणे झटपट करा स्वच्छ; जाणून घ्या ‘या’ सोप्या पद्धती
- लिंबू आणि मीठ
मंदिरात ठेवलेली पितळ आणि तांब्याची भांडी ३० मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर लिंबू अर्धे कापून त्यावर मीठ लावा आणि ही भांडी स्वच्छ करा. आपल्याला हवे असल्यास लिंबू आणि सोडा मिसळून एक द्रावण तयार करू शकता. या द्रावणाने तुम्ही भांडी देखील स्वच्छ करू शकता.
- मीठ आणि व्हिनेगर
मंदिरात ठेवलेल्या पितळेच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचे काही थेंब टाकून पितळेची मूर्ती मीठाने घासून घ्या. यानंतर कोमट पाण्याने मूर्ती धुवा. असे केल्याने जुनी काजळी स्वच्छ होते.
- पॉलिशचा वापर
पितळेची मूर्ती खराब दिसत असतील, तर ती पुन्हा चांगली दिसण्यासाठी तुम्ही खास पितळेच्या वस्तूंसाठी वापरल्या जाणार्या पॉलिशचा वापर करू शकता. सर्व अवशेष, धूळ आणि घाण काढून टाकेपर्यंत ते स्वच्छ करा.