उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आता सामान्य झाली आहे. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे ही अत्यंत गंभीर समस्या आहे. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणकोणती लक्षणे दिसू लागतात याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
कोलेस्ट्रॉल वाढल्यावर चेहऱ्यावर दिसू लागतात खालील लक्षणे
- सिरोसिसची समस्या
सिरोसिसची समस्या अनेक कारणांमुळे असू शकते, परंतु उच्च कोलेस्ट्रॉलमुळेही ही समस्या उद्भवू शकते. यामुळे तुमच्या शरीरात कोरडेपणा येऊ शकतो आणि खाज सुटून त्यातून रक्तस्त्रावही होऊ शकतो.
- घामोळे
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे चेहऱ्यावर घामोळे येऊ शकते. लोक सहसा याकडे दुर्लक्ष करतात. मात्र असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
Photos : कांद्याचे पाणी पिऊन मिळवता येणार मधुमेहावर नियंत्रण; जाणून घ्या इतर आश्चर्यकारक फायदे
- चेहऱ्यावर खाज येणे
चेहऱ्यावर जास्त प्रमाणात खाज येणे हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खाज आणि लालसरपणाची समस्या खूप दिवसांपासून दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
- त्वचेचा रंग बदलणे
उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण झाल्यास तुमच्या त्वचेचा रंग बदलू लागतो. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग हलका काळा होऊ लागतो आणि डोळ्याभोवती छोटे दाणेही दिसू लागतात. जर तुम्हाला अशी लक्षणे दिसली तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- चेहऱ्यावर दाणे येणे
उच्च कोलेस्टेरॉलमुळे डोळे आणि नाकाच्या आजूबाजूला लहान लाल दाणे येऊ शकतात. त्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)