शरीराची अंतर्गत स्वच्छता शरीराच्या बाह्य स्वच्छतेइतकीच महत्त्वाची आहे. शरीरातील अपायकारक घटक अनेक गंभीर समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. निरोगी राहण्यासाठी यावर उपाय करणे अथवा योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जंक फूड, पुरेसे पाणी न पिणे, व्यायाम न करणे, समतोल आहार न घेणे अशा अनेक वाईट सवयींमुळे ही समस्या निर्माण होते. शरीरातील या अपायकारक घटकांवर मात करणे म्हणजेच शरीर ‘डिटॉक्स’ करणे होय. जेव्हा शरीरात अशा घटकांमध्ये वाढ होते, तेव्हा शरीर संकेत देण्यास सुरुवात करते. याच संकेतांविषयी जाणून घेऊया.

  • मुखाला आणि शरीराला दुर्गंधी येणे

मुखाची दुर्गंधी आणि घामाचा उग्र वास शरीरात अपायकारक घटक निर्माण झाल्याचं मुख्य लक्षण आहे. शरीरात अपायकारक घटकांमध्ये वाढ झाल्यास मोठ्या प्रमाणावर घाम येतो. त्याचबरोबर तोंडालादेखील दुर्गंधी येते. शरीर ‘डिटॉक्स’ करण्याची गरज असल्याचा हा संकेत आहे.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

  • पोट खराब असेल

पोट फुगणे, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांनी लोक त्रस्त आहेत. परंतु हे एक लक्षण असू शकते की आपल्याला डिटॉक्सची आवश्यकता आहे. कारण आतड्यांमध्ये साठलेली घाण आणि विषारी पदार्थ तुमचे पचन बिघडवतात आणि पोटाच्या समस्या निर्माण करतात. जर तुमचे पोट खराब होत असेल किंवा पचनाच्या समस्या येत असतील तर तुम्हाला तुमचे शरीर डिटॉक्स करावे लागेल.

  • शरीरातील हार्मोनल असंतुलन

ही समस्या महिलांमध्ये अधिक आहे. महिलांना मूड स्विंग, चिडचिड, कामात अनास्था अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. कारण शरीरात विषारी पदार्थ वाढले की त्याचा परिणाम त्यांच्या चयापचयावर होतो. शरीरातील संप्रेरकांचे संतुलन राखण्यासाठी, चयापचय मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनासाठी शरीराला डिटॉक्स करणे आवश्यक आहे.

Heart Blockage : हार्ट ब्लॉकेज म्हणजे काय? जाणून घ्या याची लक्षणे आणि धोका

  • चेहऱ्यावर पुरळ आणि डाग

त्वचेच्या बहुतेक समस्या शरीरातील घाणीमुळे होतात. त्यामुळे तुमचे रक्तही अशुद्ध होते. त्वचेवर पुरळ, मुरुम, डाग यासारख्या समस्या उद्भवतात. या व्यतिरिक्त, हार्मोन्सच्या असंतुलनामुळे, त्वचेच्या अनेक समस्या आहेत, त्यामुळे जर तुम्हालाही त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर समजून जा, तुमचे शरीर डिटॉक्स करण्याची वेळ आली आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader