Periods Diet: मासिक पाळीच्या काळात महिलांना पोटदुखी, पाठदुखी, अंगदुखी, मूड बदलणे, अपचन, गॅस अशा अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोनल बदल सामान्य असतात, परंतु ते काही स्त्रियांना इतरांपेक्षा जास्त प्रभावित करतात. काही महिलांना मासिक पाळीच्या वेळी प्रचंड रक्तस्त्राव आणि वेदनांचा सामना करावा लागतो. जेव्हा तुमची मासिक पाळी जास्त काळ टिकते तेव्हा जास्त रक्तस्त्राव होतो. ‘हेव्ही’ म्हणजे तुमची मासिक पाळी सात दिवसांपेक्षा जास्त असते किंवा तुम्हाला तुमच्या मासिक पाळीत सामान्यपेक्षा जास्त रक्तस्त्राव होतो. यामुळे तुम्हाला तुमचा टॅम्पन किंवा पॅड वारंवार बदलावे लागतात. स्त्रियांमध्ये कधीकधी जास्त रक्तस्त्राव हे अशक्तपणाचे कारण बनते. मासिक पाळीत तुम्ही जे खातात त्याचा थेट परिणाम तुमच्या हार्मोन्सवर होतो. त्यामुळे महिलांनी पीरियड्सच्या काळात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा