घरातून काम आणि वाढत्या कार्यसंस्कृतीचा लोकांमधील चिंता, तणाव आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तासनतास एकाच जागी बसणे ही आजकाल लोकांची मजबुरी बनली आहे. या सक्तीमुळे केवळ शरीरावरच नव्हे तर हृदयाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम दिसून येत आहेत. जेएएमए ऑन्कोलॉजीच्या संशोधनानुसार, जे लोक जास्त वेळ बसतात त्यांना हृदयाच्या समस्या आणि कर्करोगाचा धोका ८० टक्क्याने वाढतो.
दुसरीकडे, जे लोक सक्रिय असतात ते अधिक निरोगी आणि उत्साही असतात. सतत बसून राहिल्याने अनेक आरोग्य समस्यांना प्रोत्साहन मिळते. जास्त वेळ बसून राहिल्याने आरोग्याच्या कोणत्या समस्या उद्भवू शकतात ते जाणून घेऊया.
- लठ्ठपणा वाढणे
लठ्ठपणा वाढण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी, सतत बसून राहणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. शरीर शिथिल ठेवणे किंवा जास्त वेळ न हलणे यामुळे लठ्ठपणा वाढतो. मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपची स्क्रीन लोकांना बसण्यास भाग पाडते, म्हणून प्रत्येक एक तासानंतर दहा मिनिटे चालणे आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांसोबतच शरीरालाही आराम मिळतो.
यकृताची काळजी का आहे महत्त्वाची? अभ्यासातून समोर आली माहिती
- हृदय समस्या
जास्त वेळ अॅक्टिव्ह न राहणे किंवा एकाच जागी बसून राहिल्याने हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो. बसल्याने शरीरातील रक्त परिसंचरण कमी होते ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवतात. यामुळेच तरुण वयात लोकांना कार्डिअॅक अरेस्ट सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जे लोक उभे राहून किंवा चालताना काम करतात ते अधिक निरोगी असतात.
- आयुष्यमान कमी होणे
एका जागी जास्त वेळ बसल्याने व्यक्तीच्या वयावर विपरीत परिणाम होतो. वेब एमडीच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने दिवसाचा बराचसा वेळ बसूनच व्यतीत केला तर त्याचे आयुष्य कमी होऊ शकते. जास्त वेळ बसल्याने हृदयविकार, कर्करोग आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जे लोक व्यायाम करत नाहीत आणि चालत नाहीत ते इतरांपेक्षा कमी आयुष्य जगतात.
Photos : थंड पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
- स्मृतिभ्रंशाचा धोका वाढू शकतो
जास्त वेळ बसल्याने डिमेंशियासारख्या मानसिक समस्यांचा धोका वाढतो. सतत स्क्रीन पाहणे आणि विचार केल्याने मेंदूवर परिणाम होतो, त्यामुळे मानसिक विकार होऊ शकतात. जे लोक व्यायाम करतात आणि चालतात ते निरोगी राहतात.
- डीवीटीची समस्या वाढते
डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) ही पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे होणारी समस्या आहे. जास्त वेळ पाय लटकून बसणे किंवा पायांची हालचाल कमी असणे यामुळे हा त्रास वाढू शकतो. पायात सूज आणि वेदना ही त्याची सामान्य लक्षणे असू शकतात. कधीकधी डीव्हीटीची समस्या इतकी वाढते की ती पायांपासून फुफ्फुसापर्यंत पोहोचते. फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या होतात.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)