Mosquito Repellent Natural Oil: सध्या पाऊस जोमात सुरू आहे. ठिकठिकाणी नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. पावसाळा सुरू होताच ठिकठिकाणी पाणी साचते. त्यामुळे डेंग्यू-मलेरिया सारख्या आजाराचा धोकाही वाढतो. वास्तविक, पावसाळा हा डासांच्या उत्पत्तीसाठी उत्तम काळ असतो. त्यामुळेच पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासांच्या चाव्याव्दारे होणाऱ्या आजारांचा लोकांना सर्वाधिक त्रास होतो. या आजारांवर योग्य वेळी उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकतात. अशा परिस्थितीत, डासांच्या चाव्याव्दारे होणारे रोग टाळण्यासाठी, तुम्ही नारळाच्या तेलाच्या मदतीने घरच्या घरी एक उत्तम मच्छर प्रतिबंधक बनवू शकता. नारळाच्या तेलापासून बनवलेले मॉस्कॅटो रिपेलेंट कसे बनवायचे आणि ते त्वचेवर लावण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॉस्किटो रिपेलेंट कोकोनट ऑइल कसे बनवायचे ?

डासांपासून बचाव करणारे तेल बनविण्यासाठी तुम्हाला अगदी कमी साहित्य लागणार आहे. यासाठी तुम्हाला आधी खोबरेल तेल, तुमचे आवडते इसेंशियल ऑयल, एक वाटी आणि एक चमचा लागेल. हे करण्यासाठी, प्रथम एका भांड्यात दोन चमचे खोबरेल तेल घाला, त्यात अर्धा चमचा तुमच्या आवडीचे कोणतेही इसेंशियल ऑइल घाला आणि ते चांगले मिसळेपर्यंत आणि थोडे घट्ट होईपर्यंत चमच्याने ढवळा. यानंतर हे लोशन एका बाटलीत भरा. खोबरेल तेलापासून बनवलेले तुमचे मॉस्किटो रिपेलेंट तयार आहे.

( हे ही वाचा: Disease in Monsoon : पावसाळ्यात ‘या’ ४ आजारांमुळे त्रास वाढू शकतो; वेळीच स्वतःची काळजी घ्या)

खोबरेल तेलापासून बनवलेले हे लोशन लावण्याचे फायदे

१) त्वचेसाठी फायदेशीर

हे लोशन तुम्ही त्वचेवर मॉइश्चरायझर म्हणूनही वापरू शकता. हे लोशन त्वचेवर भाजलेल्या, कापलेल्या जखमा किंवा कीटक चावल्यावर सुटणारी खाज यावर आराम मिळवून देतो. तसंच त्वचेवरील कोरडेपणापासून देखील सुटका होऊ शकते.

२) डासांना दूर ठेवण्यासाठी

नारळापासून बनवलेले हे लोशन लावल्याने डास तुमच्या जवळ येणार नाहीत आणि तुम्ही डासांपासून पसरणाऱ्या आजारांपासून दूर राहाल. हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे ज्याचा वापर करून तुम्ही डासांना स्वतःपासून दूर ठेऊ शकता आणि स्वतःचे संरक्षण करू शकता.

( हे ही वाचा: त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी ‘ही’ आयुर्वेदिक पेये ठरतील लाभदायक; रोज प्यायल्यावर दिसेल परिणाम)

३) स्ट्रेच मार्क्स काढा

पोट आणि कंबरेवर दिसणारे स्ट्रेच मार्क्स हलके करण्यासाठी त्यावर रोज खोबरेल तेल लावा. असे केल्याने स्ट्रेच मार्क्स हलके होतात. यासाठी दिवसातून एकदा हे तेल लावून मसाज केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होऊन जातील.

४) डोळ्यांखालील काळी वर्तुळे

खोबरेल तेल डोळ्यांखाली लावून तुम्ही काळी वर्तुळे घालवू शकता. डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. तसंच हे तेल चेहऱ्यावरील डाग दूर करून तुमचे सौंदर्य देखील वाढवते.