झुरळ पाहिल्यावर किळस तर येतेच, पण हा एक असा जीव आहे जो आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येतो. डब्ब्यांच्या खाली, बेसिनच्या आजूबाजूला किंवा स्वयंपाकघरात हे आढळून येतात. इतकंच नाही, तर एखादे झुरळ आपल्या घरात घुसले की बघता बघता त्यांची संख्या वाढते. अशातच घरामध्ये झुरळांची संख्या वाढण्यापूर्वी त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. आज आपण असे काही उपाय जाणून घेऊया ज्यामुळे आपल्याला झुरळांच्या समस्येपासून सुटका करून घेण्यास मदत मिळेल.

झुरळांच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies to Get Rid of Cockroach)

तेजपत्ता :

अन्नाचा सुगंध आणि चव वाढवणारा तेजपत्ता, झुरळांपासून मुक्त होण्याचा एक अनोखा मार्ग आहे. झुरळांना तेजपत्त्याचा वास सहन होत नाही, म्हणून घराच्या ज्या भागात झुरळे असतील तेथे तमालपत्र ठेवा. झुरळ त्या ठिकाणाहून आपोआप पळून जातील.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Fire , Natasha Enclave Society, Kondhwa,
पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग, रहिवासी बाहेर पडल्याने बचावले
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

पाणीपुरी खाऊन कमी करता येणार वजन? समोर आली आश्चर्यकारक माहिती

रॉकेल :

रॉकेलचा वास फारच तीव्र असतो. झुरळांना हा वास देखील सहन होत नाही. अशावेळी फरशी पुसणाऱ्या पाण्यात थोडे रॉकेल टाकून पुसल्याने झुरळ येत नाहीत. ज्या ठिकाणी फारशी पुसता येत नाही अशा ठिकाणी रॉकेल फवारले जाऊ शकते.

लवंग :

दातदुखी आणि सर्दीमध्ये लवंगचा वापर तुम्हाला माहित असेलच, परंतु झुरळे दूर करण्यासाठी देखील हे खूप प्रभावी आहे. ज्या कपाटात, ड्रॉवरमध्ये किंवा रॅकमध्ये झुरळ असतात तेथे ४ ते ५ लवंगाचे तुकडे ठेवल्यास झुरळ या भागात कधीही फिरकणार नाहीत.

बोरिक पाउडर :

बोरिक पावडर खाल्ल्याने झुरळे मरतात. पिठात बोरिक पावडर आणि साखर मिसळून गोळे तयार करा आणि ज्या ठिकाणी झुरळ येतात त्या ठिकाणी ठेवा.

वर्कआउट करण्यापूर्वी आणि नंतर कसे आणि किती प्रमाणात पाणी प्यावे; जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

साफ-सफाई :

झुरळे सहसा फर्निचरच्या खड्ड्यात, किचन सिंकमध्ये, बाथरूमच्या जाळ्यांमध्ये राहतात आणि तिथे अंडी घालतात. अशा परिस्थितीत या ठिकाणांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. शक्यतो बाथरूमच्या जाळ्यांमधून झुरळ घरात जाणार नाहीत याची काळजी घ्या.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader