गर्दी असलेल्या ठिकाणापासून दूर राहून आराम करण्याच्या उद्देशाने दुसऱे घर घेण्याचा विचार सध्या बरेच जण करतात. या घराकडे गुंतवणूक म्हणूनही पाहिले जाते. तसेच भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक पर्यायही आहे. पूर्वी, खरेदीदार गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून मालमत्ता विकत घ्यायचे आणि वर्षाच्या बहुतेक महिन्यांसाठी घरे रिक्त ठेवायचे. त्यांच्या गुंतवणूकीवरील परतफेड तेव्हाच यायची जेव्हा मालमत्तेच्या किमती वाढायच्या. पण बदलत्या काळासह अनेक लोकांनी आपले घर भाड्याने देणे सुरू केले आहे. जिथे दुसऱ्या घराचे भांडवल मूल्य कालांतराने वाढेल, तिथेच भाड्याच्या स्वरूपात पैसे देखील मिळवता येतात. घराच्या गुंतवणूकीवर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी साई इस्टेट कन्सल्टंट्सचे सह-संस्थापक अमित वाधवानी यांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या टीप्स…

• प्रवेश स्तराचे दर आणि भाड्याचे उत्पन्न

दुसऱ्या घरावरील नफा विभाग, स्थान आणि युनिट भाड्याने देण्याची शक्यता यावर अवलंबून असेल. जिथे नियमितपणे घर भाड्याने दिले जाते तिथे भाड्याची चांगली रक्कम मिळते. तथापि, जर युनिट खरेदी करण्याचा दर अधिक असेल तर त्याचा प्रभाव गुंतवणुकीच्या परताव्यावर (आरओआय) पडतो. त्याचप्रमाणे, ज्या ठिकाणी युनिटची किंमत कमी असेल त्या ठिकाणी दुसऱ्या घराची खरेदी करणे घराला कमी वारंवार भाड्याने देण्यात आणि कमी भाडे मिळवण्यात देखील भाग पडू शकते. म्हणून, दुसरे घर खरेदी करताना ज्याची पुर्नविक्रीची किंमत आणि मिळणारे भाडे चांगले असेल असेच घर घ्यायला हवे.

• आयकर कायदे

आता व्याजदरात जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. एखाद्याचा गुंतवणूक पोर्टफोलिओ तपासणे आणि एखाद्याच्या वित्त व्यवस्थेचे नियोजन करणे, तसेच अधिक पैसे खर्च न करता किंवा तोटा न होता, दुसऱ्या घराच्या फायद्यांचा आनंद घेण्याची परवानगी देईल.

• पायाभूत सुविधांचा विकास

यामध्ये लोकसंख्येचा विकास, परवडणारी किंमत, स्थान आणि पायाभूत सुविधांचा विकास हे काही घटक विचारात घ्यावे लागतात. सामान्यतः शैक्षणिक क्षेत्र आणि कॉर्पोरेट हबजवळ उच्च भाडे अपेक्षित असते. येथील पायाभूत सुविधा चांगल्या असतील तर भाडेही चांगले मिळते.

• घर खरेदी करण्याचा उद्देश

गुंतवणूकीसाठी एक चांगली जागा ओळखणे फार महत्वाचे आहे. यासाठी खरेदीदार खरेदीच्या उद्देशाविषयी स्पष्ट असणे आवश्यक आहे. अंतिम निर्णय घेण्याआधी आपल्या मित्रांशी आणि कुटुंबाशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. आधीच विकसित झालेल्या जागेत गुंतवणूक करण्याऐवजी, जलद-विकसनशील परिसरात असलेल्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करा.

दुसरे घर खरेदी करताना हे मुद्दे विचारात घ्या

1. बांधकाम व्यावसायिकांची विश्वासार्हता तपासा.

2. प्रथम घर देखील कर्जावर घेतले असल्यास वित्तपुरवठ्यासाठी व्यवस्था?

3. दुसऱ्या घरावर देय असल्याचे देखभाल आणि महापालिकेच्या करांची किमती सुनिश्चित करा.

4. आयकर परिणाम तपासा.

Story img Loader