भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. बदललेली जीवनशैली, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, निकृष्ट आहार यांमुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही जणांना मधुमेह होण्याची शक्यता असते, त्यांना मधुमेहाच्या सीमारेषेवर (Diabetes Borderline) असल्याचे म्हटले जाते. या स्थितीमध्ये व्यवस्थित काळजी घेतल्यास मधुमेह टाळता येऊ शकतो. जर तुम्ही मधुमेहाच्या सीमारेषेवर असाल तर त्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे जाणून घ्या.
मधुमेहाच्या सीमारेषेवर असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. आहारातून आपल्याला अनेक पोषक तत्वे मिळत असतात. व्यस्त शेड्युलमध्ये अनेकदा खाण्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यातच अनेक गोष्टींचा तणाव यांमुळे बरेच जण या आजाराला बळी पडतात. मधुमेहाच्या सीमारेषेवर असणाऱ्या व्यक्तींनी कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करावे. तज्ञांच्या मते कार्बोहायड्रेटमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
Health Tips : दररोज केळी खाल्याने शरीरात होतात ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल
ग्लायसेमिक इंडेक्स जाणून घ्या
जर तुम्ही मधूमेहाच्या सीमारेषेवर असाल तर तुम्हाला तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स जाणून घेणे आवश्यक आहे. ग्लायसेमिक इंडेक्सवरून कार्बोहायड्रेटमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण किती वेगाने वाढत आहे हे समजते. ५५ किंवा त्यापेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यास तो कमी प्रमाणात असल्याचे मानले जाते. तर ७० किंवा त्याहून अधिक जर ग्लायसेमिक इंडेक्स असेल तर तो जास्त प्रमाणात असल्याचे मानले जाते. योग्य आहार घेऊन ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रणात आणता येऊ शकतो.
जर तुम्ही मधूमेहाच्या सीमारेषेवर आहात तर कोणत्या पद्धतीने रक्तातील साखर नियंत्रणात आणता येऊ शकते जाणून घ्या.
खाद्यपदार्थ लक्षपुर्वक निवडा
स्टार्च नसलेल्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. मांस, विविध प्रकारचे धान्य यांचा आहारात समावेश करू शकता. जर जेवणानंतर काही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर एखादे गोड फळ खाऊ शकता. फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर अन्नपदार्थांपेक्षा कमी असतो.
परिपूर्ण आहार घ्या
तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असावेत. आहारात बाजरी, गहू, ब्राउन राईस अशा पदार्थांचा समावेश करा. व्हाईट ब्रेड खाणे टाळा. सर्व प्रकारचे प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. जर तुम्हाला फळांचा रस पिण्याची सवय असेल तर ही सवय लगेच बदला. रस पिण्याएवजी ते फळ तसेच खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरेल.
Health Tips : जेवताना पाणी प्यायल्याने वजन वाढते का? जाणून घ्या
जेवणाची वेळ निश्चित करा
मधुमेहाच्या सीमारेषेवर असणाऱ्यांसाठी जेवणाची वेळ निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वेळेवर जेवल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
व्यायाम करा
नियमितपणे व्यायाम केल्याने शरीर मजबूत होण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दररोज अर्धा तास व्यायाम केल्याने निरोगी राहण्यास मदत होते. जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही व्यायामाची वेळ वाढवू शकता. कोणता व्यायाम करावा यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरता तज्ञांचा सल्ला घ्या.)