Proteins Food : श्रावणात अनेकजण नॉनव्हेज खाणे टाळतात. अशावेळी नॉनव्हेजप्रेमी आणि प्रोटीनयुक्त डाएट पाळणाऱ्या व्यक्तींनी काय करावे, काही सूचत नाही; पण टेन्शन घेऊ नका. श्रावणात तुम्हाला हेल्दी राहायचं आहे आणि प्रोटीनयुक्त डाएट फॉलो करायचा आहे तर चिकन-मटणपेक्षा जास्त प्रोटीन्स देणाऱ्या तीन गोष्टी फिटनेस कोच मुकेश गहलोत यांनी सांगितल्या आहेत. चला तर जाणून घेऊ या.
डाळीबरोबर या तीन गोष्टी खा
मूग डाळीबरोबर काळे चणे, सोयाबीन आणि शेंगदाणे भिजवून ठेवावे. या मिश्रणाला दिवसातून दोन-तीन वेळा खावे. हे खाल्ल्यानंतर चिकन-मटणपेक्षा जास्त प्रोटीन्स शरीराला मिळतात.
हेही वाचा : केळी खरेदी करताना ‘या’ चुका तुम्हीही करता का? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स ….
प्रोटीन्ससाठी या गोष्टी खा
१. दूध, दही आणि पनीर
दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात. प्रोटीन्ससाठी पनीर, दूध आणि दहीचे सेवन उत्तम असते.
२. सोयाबीन
सोयाबीनसुद्धा प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. व्हेजिटेरियन डाएटमध्ये सोयाबीनला सुपरफूड मानले जाते.
हेही वाचा : ‘Eye Flu’ची तीव्रता कशी समजून घ्यावी आणि त्यानुसार कोणते औषध घ्यावे? वाचा, नेत्रतज्ज्ञ काय सांगतात…
३. नट्स आणि मशरुम
नट्समध्ये ओमेगा -३ फॅटी ॲसिड, व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात. तुम्ही दररोज मूठभर नट्स खावे. याशिवाय तुम्हाला मशरुम आवडत असेल तर मशरुमचे सेवनही तुम्ही करू शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)