Mobile Detox : मोबाईल ही माणसाची एक महत्त्वाची गरज बनलेली आहे. हल्ली लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच हातात मोबाईल दिसतो. काही लोक मोबाईलच्या इतक्या आहारी गेले आहे की १० मिनिटे सुद्धा मोबाईलशिवाय जगू शकत नाही. मोबाईलच्या व्यसनामुळे आपण अनेक गोष्टी गमावत आहोत.

शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. पोषक आहार, व्यायामाच्या अभावामुळे अनेक समस्या उद्भवत आहे. आपण मोबाईलच्या नादात प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे विसरत आहोत. मोबाईलमुळे आपल्या लोकांबरोबर संवाद कमी होत आहे. तसेच स्वत:ला आपण वेळ देऊ शकत नाही. तुम्ही कधी विचार केला का की एक आठवडा मोबाईल वापरणे बंद केले तर काय होईल? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? योग शिक्षिका प्रणाली कदम यांनी हा प्रयोग करून पाहिला. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्यांना आलेल्या अनुभवाविषयी सांगितले.

Alka Kubal
“त्या रोज पॅक अप झालं की…”, अलका कुबल यांनी सांगितली स्मिता पाटील यांची आठवण; म्हणाल्या…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
singer armaan malik got married to aashna shroff
प्रसिद्ध बॉलीवूड गायकाने गुपचूप उरकलं लग्न; पत्नी आहे वयाने मोठी, विवाहसोहळ्याचे फोटो आले समोर
Siddharth Chandekar & Mitali Mayekar first movie together
Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा पहिला चित्रपट! नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार, पाहा पहिली झलक
DY Chandrachud landmark verdicts
DY Chandrachud Important verdicts: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त; कशी होती त्यांची कारकीर्द? जाणून घ्या, त्यांचे काही ऐतिहासिक निर्णय
La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
bhajaniche rolls
Diwali Faral Special : खुसखुशीत भाजणी रोल! या दिवाळीत बनवा बनवा हटके रेसिपी
Salad Benefits In Marathi
Salad Benefits: रात्रीच्या वेळी सॅलड खावे का? सॅलड खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणुन घ्या फायदे…

हेही वाचा :तुम्हाला प्री-डायबिटीस आहे? लगेच करा तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ पाच गोष्टी, जाणून घ्या सविस्तर….

त्या सांगतात, “मी एक आठवडा मोबाईस वापरणे बंद केले, त्यानंतर आश्चर्यकारक गोष्टी झाल्या.” पुढे त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये याविषयी सविस्तर माहिती सांगितली.
त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मोबाईल फोनवरून एका आठवड्याचा ब्रेक घेतल्याने अनेक महत्त्वपूर्ण आरोग्य फायदे मिळू शकतात, विशेषत: मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित.

मानसिक आरोग्य चांगले राहते: सतत सूचना, सोशल मीडिया स्क्रोलिंग किंवा कामाशी संबंधित संदेशांमुळे तुम्हाला क तमीणाव अनुभव येईल.

चांगले फोकस: लक्ष विचलित न करता, तुमचे लक्ष वाढू शकते, ज्यामुळे हातातील कामांवर लक्ष केंद्रित करणे सोपे होईल, मग ते कामाशी संबंधित असो किंवा वैयक्तिक प्रकल्प.

झोप चांगली लागते: रात्री उशिरा फोन न वापरता, विशेषत: निळ्या प्रकाशाच्या प्रदर्शनामुळे, तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते, ज्यामुळे दिवसभर चांगली विश्रांती आणि अधिक ऊर्जा मिळते.

अधिक संवाद: तुमच्याकडे अधिक वास्तविक-जगातील सामाजिक परस्परसंवाद असू शकतात, जे नातेसंबंध मजबूत करू शकतात आणि तुमची सामाजिक कौशल्ये सुधारू शकतात.

छंदांसाठी वेळ: वाचन, व्यायाम किंवा इतर छंद आणि आवडींचा पाठपुरावा करणे यासारख्या दुर्लक्षित क्रियाकलापांसाठी आपल्याकडे अतिरिक्त वेळ असेल.

तर आजपासून तुम्हीही मोबाईलचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा जेणेकरून तुम्हालाही आश्चर्यकारक बदल अनुभवता येईल.”

हेही वाचा : Lower Back Pain : मासिक पाळीदरम्यान पाठदुखी कमी होण्यास किंवा टाळण्यास मदत करतील ‘हे’ सात उपाय? वाचा, डॉक्टरांचा सल्ला

पाहा व्हायरल व्हिडीओ

प्रणाली कदम यांनी yogpranali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Story img Loader