देशात प्रत्येक वर्षी निवडणुकांचा बिगुल वाजतो. कधी या राज्यात तर कधी त्या राज्यात निवडणुका असतात. लोकसभा आणि विधानसभा व्यतिरिक्त महानगरपालिका आणि नगरपरिषदांचा निवडणुका असतात. त्यामुळे देशात टप्प्याटप्प्याने निवडणुकांचे फड सुरु असतात. निवडणुकीच्या हंगामात सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयाचा दावा करतात. तसेच मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही पक्षाला जिंकण्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे. मतदान यादीत नाव असूनही ओळखपत्र नसल्याने अनेकजण मतदान करत नाही. मात्र मतदार ओळखपत्र नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणं आवश्यक आहे.
मतदार यादीत तुमचं नाव असेल आणि मतदान ओळखपत्र नसेल तर चिंता करू नका. निवडणूक आयोगाने इतर ११ प्रकारच्या कागदपत्रांना ओळखपत्र म्हणून मान्यता दिली आहे. पण एखाद्याचे नाव मतदार यादीत नसेल आणि त्याने मतदान करण्यासाठी आपले इतर कोणतेही ओळखपत्र मतदान केंद्रावर दाखवले तर त्याला मतदान करण्याची परवानगी नसते. मतदार यादीत नाव नोंदवल्यानंतरच मतदानाचा हक्क बजावता येतो.
Income Tax Return : करदाते एका वर्षात फक्त एकदाच ITR ‘अपडेट’ करू शकणार
या कागदपत्रांच्या आधारे मतदान करता येईल
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मनरेगा जॉब कार्ड
- पोस्ट ऑफिस आणि बँकेद्वारे जारी केलेलं पासबूक
- पेन्शन कार्ड ज्यावर आपला फोटो असेल आणि अटेस्टेड असेल.
- कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा कार्ड
- तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी असाल किंवा PSUs आणि Public Limited कंपनीमध्ये काम करत असाल, तर कंपनीच्या फोटो आयडीच्या आधारेही मतदान करता येईल.
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीद्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड
- खासदार/आमदार/एमएलसी यांनी जारी केलेले अधिकृत ओळखपत्र