हळू हळू स्मार्टफोनची स्क्रीन मोठी होत गेली. हे मोठ्या स्क्रीनचे फोन सहज आपल्या खिशात किंवा छोट्या बॅगेतही बसू शकत नाहीत एवढी साईज या स्मार्टफोनची झाली आहे. या फोनचे वजनही जास्त असते. मोठ्या स्क्रीनवर एखादा व्हिडीओ किंवा अन्य गोष्टी बघण्याचा चांगला अनुभव मिळतो. पण मोठ्या स्क्रीनमुळे अनेकदा फोन वापरण्यासाठी दोन्ही हातांचा वापर देखील करावा लागतो. याच्याच उलट छोट्या स्कीनवर आपण एका हाताने काम करू शकतो. छोट्या स्क्रीनचे फोन आपल्या खिशात, बॅगेत सहजपणे मावतातही. खाली छोट्या आणि कॉम्पॅक्ट डिव्हाइस असलेल्या काही फोनची यादी देत आहोत. हे फोन खिशात सहज बसू शकतात आणि सहजपणे ऑपरेटही केले जाऊ शकतात.
कॉम्पॅक्ट स्मार्टफोनची यादी
१. पिक्सेल ४ ए (Pixel 4A)
४ जी पिक्सेल ४ ए फोनमध्ये ५.८१ इंचाची स्क्रीन आहे. तसेच यात स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर, ६ जीबी / १२८ जीबी कॉन्फिगरेशन आणि ३,१४० एमएएच बॅटरी आहे. याची कींमत २९,९९९ रुपये आहे.
२. आयफोन १२ मिनी (iPhone 12 Mini)
आयफोन १२ मिनी या नावातच सगळ आलं. छोट्या बायोनिक चिपसह एकत्र केलेली एक छोटी ५,.४ इंच स्क्रीन आयफोन १२ मिनीची आहे. म्हणूनच हा सर्वात शक्तिशाली कॉम्पॅक्ट फोन आहे. याची इतर वैशिष्ट्य म्हणजे १२ एमपी ड्युअल रेयर कॅमेरा आणि २२२७ एमएएच बॅटरीचा यात समावेश आहे. याची कींमत ६६,४०० रुपये आहे.
३. आयफोन एस ई (iPhone SE)
आयफोन एस ई हा फ्लॅगशिप मालिकेसारखा शक्तिशाली नाही, परंतु मोठ्या प्रमाणात त्याच सॉफ्टवेअरचा अनुभव देणारा फोन आहे. हा ७.७. इंचाचा फोन आयफोन ११ सीरिजमधील ए १३ चिपसह सिंगल १२ मेगा रेयर कॅमेरा आणि १८२१ एमएएच बॅटरी असलेला आहे. या फोनची किंमत ३९,९०० रुपये आहे.
४. सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप (samsung Galaxy Z Flip)
नावाप्रमाणे हा फ्लिप होणारा फोन आहे. या फोनच्या डिव्हाइसमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले आहे जो फोनसह अर्ध्या भागामध्ये दुमडला जातो. फोन स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस आणि १२ एमपी ड्युअल रेअर कॅमेरा, ८ जीबी / २५६ जीबी कॉन्फिगरेशनसह येतो. यामध्ये ३,३०० एमएएच बॅटरी आहे. याची कींमत ७०,५५० रुपये आहे.