भारतीयांसाठी चहा म्हणजे जणू अमृतच. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकवेळा लोक चहा घेतात. विशेषत: हा चहा सकाळी उठल्या उठल्या घेण्याचे प्रमाण भारतीयांमध्ये जास्त आहे. मात्र सकाळी चहा घेण्याचे आरोग्यावर अतिशय विपरित परिणाम होतात. अनेकांना हे नसते, मात्र ज्यांना माहित असते तेही केवळ सवय म्हणून सकाळी उठल्यावर चहा घेतातच. दिवसाच्या इतरवेळी एखादा चहा पिणे ठिक आहे. पण सकाळचा चहा मात्र घातकच असतो. आता याचे नेमके कोणते तोटे होतात पाहूया…
१. चहामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक असतात. रात्रभर पोट रिकामे असल्याने त्यावर चहा प्यायल्यास अॅसिडिटी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आरोग्याच्या इतरही अनेक तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते.
२. अनेकजण चहा पिणे घातक आहे हे माहित असल्याने दुधाचा चहा पितात. मात्र ज्यांना जास्त दुधाचा चहा आवडतो अशा लोकांना सकाळी असा चहा प्यायल्यावर थकवा येण्याची शक्यता असते. चहामध्ये दूध घातल्याने त्यातील अँटीऑक्सिडंटसचा परिणाम नष्ट होतो. हे आरोग्यासाठी चांगले नसते.
३. अनेकांना कडक चहा प्यायला आवडतो. मात्र चहामध्ये पचनसंस्थेशी निगडीच तक्रारी निर्माण होतात. यामुळे आपल्याला पोटाशी निगडीत अनेक समस्या उद्भवतात.
४. भारतीयांमध्ये नाष्ता किंवा जेवणानंतरही चहा पिण्याची पद्धत आहे. मात्र हे तर आरोग्यासाठी जास्तच घातक असते. काहीही खाल्ल्यानंतर चहा प्यायल्यास त्या अन्नातील पोषक घटक त्यामुळे नष्ट होतात. त्यामुळे खाल्ल्यानंतर चहा पिणे आरोग्यासाठी धोक्याचे असते.
५. अनेकजण दिवसातून अनेकदा चहा पितात. त्यामुळे भूक मरते. तसेच खूप गरम चहा पिण्यानेही आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. या तक्रारी अनेकदा गंभीर रुप धारण करण्याचीही शक्यता असते.