आजकाल तरुण असो वा वृद्ध, प्रत्येक वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, त्यामुळे तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जबडा दुखणे हे ‘सौम्य हृदयविकाराचा झटक्याचे लक्षण देखील असू शकते. जर छातीत दुखणे, अस्वस्थता आणि घाम येणे अशी समस्या असेल तर ही देखील हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. आपण कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये हे जाणून घ्या.

हृदयविकाराच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

जबडा दुखणे

जबड्याच्या मागच्या भागात दुखणे हे सौम्य हृदयविकाराचे लक्षण असू शकते. यामध्ये वेदना जबड्यापासून सुरू होऊन मानेपर्यंत पसरते. ही वेदना खूप अचानक होते. तुम्हाला याची चिन्हे आधीच दिसत नाहीत.

Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

हातात मुंग्या येणे

हात दुखणे किंवा मुंग्या येणे हे सौम्य हृदयविकाराचे लक्षण आहे. ही वेदना छाती आणि मानेपर्यंत वाढू शकते.

अचानक घाम येणे

जर तुम्हाला रात्री अचानक घाम येऊ लागला तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका.

श्वास घेताना धाप लागणे आणि चक्कर येणे

पायर्‍या चढल्यानंतर जर तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला तर तुमचे हृदय नीट काम करत नसल्याचे समजते. याशिवाय श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे आणि छातीत दुखणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.

ढेकर येणे आणि पोटात दुखणे

ढेकर येणे आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवणे हे हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. ढेकर येणे, पोटदुखी ही सौम्य हृदयविकाराची लक्षणे आहेत.