तोंडात फोड येण्याची अनेक कारणे असू शकतात. हे पोषक तत्वांची कमतरता, तोंडातील काही बॅक्टेरियाची ऍलर्जी यांचा परिणाम असू शकतो. मात्र, ही लक्षणे कायम राहिल्यास सावध होणे गरजेचे आहे. कारण ही लक्षणे तोंडाच्या कॅन्सरची असू शकतात.
तोंडाचा कॅन्सर म्हणजे काय?
ओठ किंवा तोंडाच्या पेशी अनियंत्रितपणे वाढतात किंवा बदलतात तेव्हा तोंडाचा कॅन्सर होतो. मेयो क्लिनिकच्या मते, तुमच्या ओठांच्या आणि तोंडाच्या आतील बाजूस असलेल्या पातळ पेशींमध्ये कॅन्सर सुरू होतो. त्यांना स्क्वॅमस पेशी म्हणतात आणि स्क्वॅमस सेलच्या डीएनएमधील लहान बदलांमुळे पेशी असामान्यपणे वाढतात. अशा लक्षणांमुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस (NHS) नुसार, तोंडाचा कंसर हा एक ट्यूमर आहे जो जीभ, तोंड, हिरड्यांच्या पृष्ठभागावर विकसित होतो. हे लाळ ग्रंथी, टॉन्सिल्स मध्ये देखील होऊ शकते. तुमच्या तोंडाच्या क्षेत्रापासून ते तुमच्या श्वासनलिकेपर्यंत, तोंडाच्या या भागात लक्षणे लवकर दिसू शकतात.
तोंडाच्या कॅन्सरची महत्त्वाची लक्षणे
- वेदनादायक फोड जे आठवड्यात बरे होत नाहीत
- सैल दात किंवा सॉकेट जे काढल्यानंतर बरे होत नाहीत
- तोंडात सुन्नपणाची सतत भावना होणे
- तोंडावर किंवा जिभेवर पांढरे किंवा लाल ठिपके येणे
( हे ही वाचा: आवळा खाल्ल्याने Blood Sugar झपाट्याने कमी होऊ शकते; कधी आणि कसे सेवन करावे जाणून घ्या)
डॉक्टरकडे कधी जावे?
तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे किरकोळ स्तिथीत असतील तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र असे न करता वेळीच आपण साधी दातदुखी किंवा तोंडात फोड आले तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि लक्षणे तपासणे केव्हाही चांगले आहे. NHS च्या म्हणण्यानुसार, लवकर शोध घेतल्यास जगण्याची शक्यता ५०% ते ९०% वाढू शकते.
धोका कसा कमी करायचा?
मेयो क्लिनिक मते तोंडाच्या कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर तंबाखूचे सेवन सोडले पाहिजे. मग ते धूम्रपान असो किंवा तंबाखू खाणे असो. यासोबतच ओठांवर जास्त सूर्यप्रकाश टाळा. तसेच दातांच्या नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.