थंडीच्या वातावरणात थंड वारे त्वचेची सर्व आर्द्रता काढून घेतात, त्यामुळे या ऋतूत त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्वचेची निगा राखण्यासाठी कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर पुरेसा नाही, तर तुम्हाला काही प्रभावी घरगुती उपायही अवलंबावे लागतील. हिवाळ्यात त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी दुधाची साय खूप फायदेशीर ठरते. चेहऱ्यावर क्रीम वापरून वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी करता येतात.
दुधातून तयार होणारी साय आपल्या कोरड्या त्वचेसाठी फारच प्रभावी ठरते. तसेच ही साय त्वचेवर नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. दुधातील साय अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये देखील वापरली जाते. तुम्ही ही साय त्वचेवर लावल्याने कोरडेपणा दूर होतो, रंग सुधारतो, तसेच त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार होतात. चला जाणून घेऊया त्वचेसाठी दुधातील साय वापरण्याचे कोणते फायदे आहेत.
दुधातील साय चेहऱ्यावर आणते चमक
चेहऱ्यावर दुधातील साय योग्य पद्धतीने लावल्याने त्वचेवर चमक येते. सकाळी आणि संध्याकाळी दोनदा तुम्ही त्वचेला साय लावून मसाज केल्याने त्वचा चमकदार, मुलायम आणि गुळगुळीत होते. मसाजिंग केल्याने त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा तरूण आणि सुंदर दिसते.
त्वचा स्वच्छ करते
जर तुम्हाला त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ करायची असेल तर दुधाची साय वापरा. ही साय लावल्याने त्वचेच्या छिद्रांना खोलवर साफ करते, तसेच याचा नियमित वापर केल्याने त्वचेवर साचलेली घाण साफ होऊन त्वचा चमकदार दिसते.
Celebs Fitness: अभिनेत्री प्रीती झिंटाचं फिटनेस सीक्रेट; तुम्हीही घ्या अशी काळजी
स्क्रब म्हणून दुधातील साय वापरा
दुधातील साय तुम्ही स्क्रब म्हणूनही वापरू शकता. दुधाच्या सायमध्ये ओटचे बारीक दाणे मिसळा आणि चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा. ओटमील आणि साय हे तुमच्या चेहऱ्यासाठी एक उत्तम स्क्रबर आहे, जे चेहऱ्यावरील घाण साफ करेल, तसेच त्वचेवर चमक आणेल.
चेहर्यावरील टॅनिंग काढून टाकण्यास होते मदत
त्वचेवरील टॅनिंग काढायचे असेल तर चेहऱ्यावर साय वापरा. दुधातील साय त्वचेचे पोषण करते, तसेच त्वचा टॅनिंगपासून मुक्त होते. टॅनिंग दूर करण्यासाठी, सायमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि त्वचेवर १५ मिनिटे लावा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा.
डार्क स्पॉट्स दूर करण्यास फायदेशीर
जेव्हा साय लिंबाच्या रसासोबत लावली जाते तेव्हा साय डेड स्कीन सेल्सना पुन्हा सक्रीय करते. याने डार्क स्पॉट्स दूर होण्यास मदत होते. साय आणि लिंबाचं मिश्रण स्कीनवर हळुवार लावा, सुकू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. याचा नियमित वापर केल्याने डार्क स्पॉट्स दूर होतात.