Amla Tea: वाढत्या वजनामुळे पर्सनालिटी तर बिघडतेच शिवाय शरीर अनेक आजारांचे घर देखील बनते. आपले आरामदायी जीवन आपल्याला नकळत लठ्ठपणाचे शिकार बनवत आहे. देशात आणि जगात जास्त वजन असलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. १९८० पासून भारतासह ७० पेक्षा जास्त देशांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. एका अहवालानुसार २०४५ पर्यंत संपूर्ण जगात एक चतुर्थांश लोक लठ्ठ असतील. लठ्ठपणा वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कॅलरी बर्न करण्यापेक्षा जास्त कॅलरी वापरणे. अस्वास्थ्यकर जीवनशैली, ताणतणाव आणि जास्त कॅलरीजमुळे लोक लठ्ठ होतात.

लठ्ठपणा आटोक्यात आणण्यासाठी लोक आहारावर नियंत्रण ठेवतात, विविध उपायांचा अवलंब करतात, जिममध्ये तासनतास व्यायाम करतात, काही लोक हताश होऊन बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यास तयार असतात. पण तुम्हाला माहिती आहे की लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला इतके प्रयत्न करण्याची गरज नाही, फक्त थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. कॅलरीजचे प्रमाण कमी करून आणि त्याचा वापर वाढवून तुम्ही वजन नियंत्रित करू शकता.

( हे ही वाचा: कांद्याच्या रसाने खरोखरचं केस गळणे थांबतात का? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच)

हेल्थलाइनच्या बातमीनुसार, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळा चहा हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हा चहा तुम्ही दिवसातून दोनदा सेवन केल्यास तुमच्या कॅलरीजचे प्रमाण मर्यादित राहते आणि वजनही नियंत्रणात राहते. आवळा चहा वजन नियंत्रणात कसा फायदेशीर आहे आणि तो कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

आवळा चहा वजन नियंत्रणात कसा फायदेशीर आहे

फायबर युक्त आवळा खाल्ल्याने भूक नियंत्रित राहते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. आवळ्याचा चहा प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठताही दूर होते. आवळा चहा दिवसातून दोनदा प्यायल्याने भूक कमी होते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता. याच्या सेवनाने वजन सहज नियंत्रित राहते.

शरीरासाठी आवळा चहाचे फायदे

  • अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आवळा चहाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि जळजळ कमी होते.
  • या चहाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते.
  • मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा कमी करायचा असेल तर हा चहा घ्या.
  • आवळा चहा प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात.
  • फायबर युक्त आवळा खाल्ल्याने भूक नियंत्रित राहते.

( हे ही वाचा: हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल? फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या)

वजन कमी करण्यासाठी आवळा चहा कसा बनवायचा

आवळा चहाचे सेवन वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात २ कप पाणी घ्या, त्यात एक चमचा आवळा पावडर घाला. तसेच अर्धा चमचा आले आणि एक चतुर्थांश चमचे काळी मिरी घाला आणि सर्व काही १०-१५ मिनिटे शिजवा. काही वेळ शिजवल्यानंतर ते गाळून त्यात एक चमचा मध मिसळून सेवन करा. आवळा चहामुळे पोटाची जड चरबीही दूर होईल.

Story img Loader